WhatsApp चॅट डिलीट झाला? या टिप्सने करा सोप्या पद्धतीने रिकव्हर!

व्हॉट्सॲपमुळे आपली अनेक कामं अगदी सोपी झाली आहेत. इन्स्टिंक्ट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमुळे आपण कोणत्याही व्यक्तिला एका क्षणात(Message) मॅसेज करू शकतो.

व्हॉट्सॲपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. व्हॉट्सॲपवर आपल्याकडे इतके कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप आहेत, की सतत सर्वांचे (Message)मॅसेज येत असतात. अशावेळी आपण हे चॅट्स डिलीट करतो.

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या व्यक्तिची किंवा ग्रुपची चॅट डिलीट करतो, आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला पुन्हा चॅटची आवश्यकता असते तेव्हा रिकव्हर कसे करायचे हेच आपल्याला माहित नसते.

पण यासाठी एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात चॅट रिकव्हर करू शकता. परंतु यासाठी तुमच्याकडे चॅट बॅकअप असणं आवश्यक आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये डिलीट केलेल्या चॅट्स कशाप्रकारे रिकव्हर करू शकता, याबद्दल जाणून घेऊया.

जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करायच्या असतील, तर तुमच्या व्हॉट्सॲप डेटाचा बॅकअप रिस्टोअर करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही चॅट डिलीट करण्यापूर्वी नियमित बॅकअप सेट केला असेल, तर तुम्ही सहजपणे ॲपमध्ये डेटा इंपोर्ट करू शकता आणि तुमच्या चॅट रिकव्हर करू शकता.

चॅट्सचा बॅकअप घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गूगल ड्राइव्ह वापरणे. तुम्ही गूगल ड्राइव्हवर आधीच बॅकअप घेतला असल्यास, तुमच्यासाठी चॅट रिकव्हरी खूप सोपी असेल.

सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सॲप ओपन करा.
येथे वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करा.
यानंतर सेटिंगमध्ये चॅटमध्ये जा.
चॅट बॅकअप वर क्लिक करा. येथे गूगल ड्राइव्हवर बॅकअप निवडा.
तुम्हाला एक नवीन पेज दिसेल जिथे तुम्ही तुमच्या चॅटचा किती वेळा बॅकअप घ्यायचा हे निवडू शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.
तुम्हाला जिथे व्हॉट्सॲप बॅकअप ठेवायचा आहे त्या गूगल अकाऊंटसोबत लिंक करा.
तुम्हाला वाय-फाय किंवा मोबाइल डेटावर बॅकअप घ्यायचा आहे का ते निवडा.
सर्व पर्याय निवडल्यानंतर बॅकअप प्रक्रिया सुरू होईल
नियमित बॅकअपसह, तुमची चॅट हिस्ट्री क्लाउडमध्ये स्टोअर केली जाईल.
अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा आपल्याला त्याची आवश्यकता असेल तेव्हा आपण ते रिकव्हर करू शकता.

व्हॉट्सॲपवर तुम्ही नंबर सेव्ह न करता देखील मॅसेज पाठवू शकता. यासाठी, प्रथम न्यू चॅटवर क्लिक करा आणि वरच्या बाजूला ‘मेसेज युवर सेल्फ’ वर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो नंबर तुम्हाला सेंड करा. नंबर पाठवल्यानंतर त्यावर क्लिक करून चॅट विथ थिस नंबरवर क्लिक करा. असे केल्याने तुम्ही त्या व्यक्तीशी सहज चॅट करू शकाल, तेही नंबर सेव्ह न करता.

हेही वाचा :

‘1 एप्रिलपासून…’ मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी मोठा निर्णय

पोलिस पाटलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ‘ती’ विनंती ठरली कारणीभूत

प्रेमाचा खोटा दिखावा कधीच करत नाही ‘या’ जन्मतारखेचे लोक!