संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वादात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे(political leaders) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. मात्र, भाजप नेत्यांची कृती लक्षात घेता पक्ष मुंडे यांच्याबाबत फार काही अनुकूल नसल्याचे नसून राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची(political leaders) मागणी लावून धरली आहे. भाजपचे आमदार सुरेश धसदेखील मुंडे यांच्या हकालपट्टीची सातत्याने मागणी करीत आहेत. ते रोज नवे आरोप करत असताना भाजपने त्यांना आवरलेले दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करीत असताना भाजपकडून धस यांना मोकळीक कशी दिली जाते, असा सवाल केला जात आहे.
बीडमधील गुंडगिरीविरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्या आल्या असता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसात धाव घेतली. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या दमानिया यांच्या मदतीला भाजपच्या आमदार धावून गेल्याचे यामुळे दिसले. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याबद्दल अजित पवार गटाकडून संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं आहे. शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपालांचीही भेट घेतली आहे.
हेही वाचा :
नोकराने मालकाकडे मागितली ७० लाखांची खंडणी अन्…धक्कादायक घटना
“प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे…”, मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video
आझाद’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा जरूर पाहा! VIDEO