– महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
निरोगी आणि अधिक सक्रिय जीवनशैलीचा मार्ग फिटनेस चाचणीतून(lifestyle) जातो जी खूप महत्त्वाची असते; परंतु बरेच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फिटनेस टेस्टिंगमध्ये आपल्या शरीराच्या फिटनेसची चाचणी केली जाते- ज्यामध्ये कार्डिओवस्कुलर इंड्युरन्स, स्नायूंची स्ट्रेंग्थ, लवचिकता आणि शरीररचना यासारख्या शारीरिक पैलूंच्या मूल्यांकनाचा समावेश होतो.

अशी चाचणी करण्याची गरज फक्त अॅथलिट्स आणि फिटनेसप्रेमी लोकांची असते हा एक गैरसमज आहे; परंतु सत्य हे आहे की फिटनेस चाचणी प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे. या लेखात,अशी (lifestyle) चाचणी करण्याची गरज फक्त अॅथलिट्स आणि फिटनेसप्रेमी लोकांची असते हा एक गैरसमज आहे; परंतु सत्य हे आहे की फिटनेस चाचणी प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण आहे. या लेखात, आपण फिटनेस चाचणी महत्त्वाची का आहे आणि सर्व वयोगटातील आणि तंदुरुस्तीच्या पातळीवरील व्यक्तींना त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे शोधून काढू आपण फिटनेस चाचणी महत्त्वाची का आहे आणि सर्व वयोगटातील आणि तंदुरुस्तीच्या पातळीवरील व्यक्तींना त्याचा कसा फायदा होऊ शकतो हे शोधून काढू.
फिटनेस चाचणीचे महत्त्व काय हे शोधण्यापूर्वी त्याची संकल्पना समजावून घेऊ या. फिटनेस चाचण्या शारीरिक तंदुरुस्तीच्या वेगवेगळ्या घटकांचे मोजमाप करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.(lifestyle) आपल्याला आपल्या सद्यस्थितीच्या आरोग्याबद्दल आणि फिटनेसच्या स्थितीबद्दल जाणीव करून देतात. या चाचण्या प्रमाणित पद्धतींचा वापर करून केल्या जातात, ज्यामुळे त्यांचे निष्कर्ष गरजेप्रमाणे अचूक तुलना आणि फिटनेसच्या प्रगतीचा वेळोवेळी मागोवा घेतात.
बेसलाइन मूल्यांकन
फिटनेस चाचणी आपल्याला आपल्या सध्याच्या फिटनेस पातळीचे बेसलाइन मूल्यांकन करून देते. ही माहिती एक सुरुवात म्हणून किंवा आरंभबिंदू म्हणून आपल्याला फायदेशीर ठरते. त्याच्या आधारावर आपण वास्तववादी आणि साध्य करण्यायोग्य फिटनेस गोल सेट करू शकतो.
आपले उद्दिष्ट वजन कमी करणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारणे किंवा स्नायूंची ताकद तयार करणे हे असेल, तर आपण फिटनेसबद्दल नक्की कोठे उभे आहात हे जाणून घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला आपली फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्लॅन तयार करता येतो.
वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम
फिटनेस चाचणीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या वैयक्तिक गरजांनुसार त्याची आखणी करता येते. प्रत्येक व्यक्तीची बलस्थाने आणि कमजोरी वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीच्या अशा विशेष गरजा भागवणाऱ्या या चाचण्या असल्याने व्यक्तीला त्याच्या अनुषंगाने आपल्या व्यायामात आणि फिटनेसच्या पातळीत झालेली सुधारणा दिसते. असा प्रत्येकाच्या गरजा भागवणारा दृष्टिकोन असल्याने या चाचण्या उपयुक्त ठरतात.
प्रगतीचा आलेख तपासणे
नियमित फिटनेस चाचणी आपल्याला आपल्या प्रगतीचा अचूक ट्रॅक करण्यास मदत करते. वेळोवेळी होणारी सुधारणा पाहिली, की आपल्यालाच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. जर आपल्या पुश-अपच्या संख्येत वाढ झाली असेल किंवा आपण आपल्या १ मैलाच्या धावण्याच्या वेळेमध्ये कपात केली, तरीही आपल्या फिटनेसमध्ये होणारी आणि मोजता येणारी प्रगती आपल्याला पुढे जायला प्रेरणा देईल.
दुखापतीपासून सावधान
ओव्हरट्रेनिंगमुळे आपल्या फिटनेसच्या प्रवासात अडथळा आणून बर्नआउट आणि दुखापत होऊ शकतात. फिटनेस टेस्टिंगमध्ये आपल्याला आपल्या मागच्या कार्यक्षमतेची तुलना आजच्या कार्यक्षमतेशी करता येते. जर आपल्याला कामगिरीमध्ये अचानक बदल दिसून आला तर आपल्या ट्रेनिंगची तीव्रता तपासायला हवी आहे किंवा कदाचित आपल्या शरीराला रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.
आरोग्याचे नियमन
फिटनेस चाचण्या आपल्या आरोग्याच्या स्थितीवर प्रकाश टाकू शकतात. उदाहरणार्थ, शरीररचना मोजण्यासाठीच्या चाचण्या आपल्या शरीरात स्नायू आणि चरबीच्या प्रमाणाबद्दल माहिती देतात. त्यामुळे लठ्ठपणा किंवा चयापचय विकार यासारख्या विशिष्ट आरोग्याला किती धोका आहे हे कळते. नियमित चाचणी आपल्याला आरोग्याच्या संभाव्य समस्यांविषयी सतर्क करू शकते जे कदाचित अन्यथा आपल्या लक्षातही येणार नाहीत.
प्रेरणा आणि जबाबदारी
फिटनेस चाचणी जवळ येत आहे हे जाणून घेतल्यामुळे आपल्याला व्यायामाचे रूटिन शिस्तबद्ध पद्धतीने चालू ठेवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. आपण फिटनेस उद्दिष्ट्य साध्य करतो की नाही हे पाहण्यासाठी आपल्या रूटिनपासून ढळत नाही. शिवाय, आपले या चाचणीचे निकाल आपल्या फिटनेस व्यावसायिक, प्रशिक्षक किंवा अगदी मित्र आणि कुटुंबासह शेअर केल्याने ती प्रगती तशीच चालू ठेवण्याची जबाबदारी असते.
ट्रेनिंगमध्ये गरजेप्रमाणे बदल
आपली फिटनेस पातळी विकसित होते, तसतसा आपल्या ट्रेनिंगमध्ये बदल करणे गरजेचे असते. फिटनेस चाचण्यांमुळे व्यायामाची तीव्रता कमी, जास्त करणे, त्याचा वेळ कमी-जास्त करणे आणि व्यायामाचा प्रकार याची माहिती मिळते आणि तसे बदल आपण करू शकतो. यामुळे फिटनेसची एकच पातळी राखण्यापेक्षा शरीराला नवनवीन आव्हाने देत राहणे गरजेचे असते. त्यामुळे फिटनेसच्या पातळीत प्रगती होते.
निकालावर आधारित निर्णय
फिटनेसच्या चाचण्या वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित आहेत. या चाचण्यांमधून गोळा केलेला डेटा आपल्याला पुढील निर्णय घ्यायला मदत करतो. हा डेटा आपल्या प्रगतीचा पुरावाच असतो. मग तो आपला आहार नियंत्रित करीत असो, आपल्या व्यायामाच्या रूटीनमध्ये बदल असो किंवा नवीन व्यायामाचा समावेश करणे असो, आपण अंदाजे काही करण्यापेक्षा डेटावर आधारित माहितीच्या आधारे पुढे जाऊ शकतो.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं