खळबळजनक ! महिलेची हत्या करून मुलाने घेतला आईला चापट मारल्याचा बदला

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात अकोल्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेने आईला थापड मारली म्हणून मुलाने या अपमानाचा बदला महिलेचा (killing)खून करून घेतल्याची अतिशय निर्दयी घटना मंगळवारी (दि.7) पहाटे अकोल्यात घडली.

धीरज चुंगडे या तरुणाने हा प्रकार केल्याची माहिती समोर आली. कुठलेही व्यसन नसलेल्या धीरजने हे कृत्य का केले? असा प्रश्न उपस्थित होत असून, नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.

सविता ताथोड असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी धीरज चुंगडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही (killing)हत्या गंभीर असून, महिलेच्या हत्येने चांगलीच खळबळ उडाली आहे. सविता ताथोड यांच्यावर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आईला मारहाण झाल्याचा बदला म्हणून मुलाने हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोघांच्या किरकोळ वादातून ही घटना मंगळवारी पहाटे घडली. मृत सविता ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज चुंगडे यांच्यात 2 महिन्यांपूर्वी किरकोळ वाद झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता ताथोड पहाटे सहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत मॉर्निंग वॉककरिता गेल्या होत्या. आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता ताथोड यांना अडवून गळा त्यांचा आवळला आणि खाली पाडले. सोबत असलेल्या महिलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात त्याला यश आले नाही.

किरकोळ कारणावरून ही हत्या झाली असून, या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात फरार आरोपी धीरज चुंगडे यांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. दरम्यान, सविता ताथोड यांच्यासोबत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेने हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पुरुषाने देखील हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. धीरज आवरण्यापलीकडे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. गावातील लोकांना बोलविण्यासाठी हे दोघे पळत सुटले आणि परत आले तेव्हा सविता ताथोड या निपचित पडल्या होत्या.

हेही वाचा :

बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्…

रात्री उशिरा घरी जाणाऱ्या तरुणीच्या 3 पुरुषांकडून पाठलाग, दरवाजा तरुणीला घाबरवलं! अन्…

भाजपकडून लोकशाही हायजॅक; निवडणूक आयोग झालं ताटाखालचं मांजर; राऊतांचा थेट घणाघात