सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल(viral) होत असते. कधी मजेशीर तर कधी अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यासांरखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक चीनमधील अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पर्यटकांच्या अंगावर भला मोठा बर्फाचा गोळा पडला आहे.
हिवाळा म्हटले की, लोक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक बर्फाळ प्रदेशांना भेट देतात. मात्र, या सौंदर्याचा आनंद घेताना नियमांचे पालन करणे आणि स्वत:ची काळजी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे न केल्यास संकट ओढवू शकते. व्हायरल(viral) होत असलेला व्हिडिओत डोंगरावरुन कोसळणार बर्फ वेगाने खाली पडला आणि पर्यटक अडकले. यानंतर अतिशय धक्कादायक परिस्थिती उद्भवली आणि इतर पर्यटकांची पळापळ झाली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,एका बर्फाच्छादित प्रदेशात डोंगरावर एक थर थंडीमुळे गोठेलेला आहे. काही पर्यटक एका बर्फाच्या दरीत मज्जा-मस्ती करत आहेत. याचदरम्यान डोंगरावरील तयार झालेल्या भर्फाचा तुकडा तुटतो आणि वाऱ्याच्या वेगाने पर्यटकांच्या अंगावर पडतो.
पर्यटकांना काय घडत आहे हे समजायच्या आधी काही लोक त्या बर्फाखाली अडकतात, इतर लोक घाबरून जोरजोरात ओरडू लागतात तर काही पर्यटक सैरावैरा पळू लागतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा चीनमधील शिआन, शांक्सी येथील हेशांचा धबधब्याच्या ठिकाणी घडलेल्या घटनेचा आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @livingchina या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बर्फाखाली आणखीही काही लोक अडकलेले असतील, असे मला वाटते? तर दुसऱ्या एकाने अंगावर काटाच आला असे म्हटले आहे.
यानंतर काय झाले, यामध्ये कोणाला गंभीर दुखापत तर झाली नाही ना असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. सध्या हा व्हिडिओ अशा ठिकाणी गेल्यावर किती काळजी घेतली पाहिजे याचे महत्त्व अधोरेखित करते.
हेही वाचा :
विधानसभेसाठी केजरीवालांची मोठी खेळी, भाजप मंदिर समितीच्या 100 सदस्यांचा आपमध्ये प्रवेश
वाल्मिक कराडचा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी संबंध; ओबीसी नेत्याचा गौप्यस्फोट
“त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली..”; वादग्रस्त विधानावरुन राजकारण रंगलं