Novak Djokovic पहायला विराट कोहली पोहोचला विम्बल्डनला! सूट-बूटमध्ये दिसला किंग

किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची (wife)पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते. यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूकमध्ये पाहायला मिळाला.

विराट कोहली विम्बल्डनमध्ये : विराट कोहलीने काही काळापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भविष्यात तो फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसणार आहे. अलिकडेच (wife)तो क्रिकेट दरम्यान नाही तर एका टेनिस स्पर्धेत आपली उपस्थिती दाखवताना दिसला. दरम्यान, किंगने त्याचा स्टायलिश लूकही दाखवला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नुकतेच दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविचचा विम्बल्डन सामना पाहण्यासाठी गेले होते.

यावेळी कोहलीने एक जबरदस्त लूक दाखवला. तो सूट आणि बूटमध्ये दिसला. कोहलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जिथे तो त्याची पत्नी अनुष्कासोबत खेळाचा आनंद घेत आहे.(wife) नोवाक जोकोविचचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनौरशी झाला. नोवाकची सुरुवात फारशी चांगली नव्हती आणि तो पहिल्या फेरीत १-६ ने पिछाडीवर होता.

तथापि, या अनुभवी खेळाडूने यानंतर पुनरागमन केले आणि चार फेऱ्या चाललेल्या सामन्यात विजय मिळवला. यासह, जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विम्बल्डन पाहण्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. १० वर्षांपूर्वीही विराट आणि अनुष्का ही महान टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी आले होते.

काही चाहत्यांनी २०१५ आणि २०२५ चे त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यांची तुलना केली. दोघांमध्ये विराटचा लूक पूर्णपणे वेगळा दिसतो. विम्बल्डनमध्ये नोवाक जोकोविचच्या विजयावर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि नोवाकचे खूप कौतुक केले. त्याने लिहिले, ‘किती छान सामना होता. ग्लॅडिएटरसाठी नेहमीप्रमाणेच हे सोपे काम होते.’

2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली होती त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड दौऱ्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आरसीबी आयपीएल २०२५ चे टायटल जिंकण्यात यशस्वी झाली. आता तो फक्त एक दिवसीय क्रिकेट खेळताना भारतीय चाहत्यांना दिसणार आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं