स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची(Election) रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने १० जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. बैठकीसाठी निवडणुका घेण्यात येणाऱ्या संस्थांची माहिती, मतदारसंख्या, मतदान केंद्रांची माहिती, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता, मनुष्यबळ आणि वेळेवर उद्भवणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समित्यांवर लक्ष :
या निवडणुकांमध्ये(Election) राज्यातील ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषद, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये महानगरपालिका वगळता इतर संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयुक्त हे स्वतः विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा तपशील विचारणार आहेत. आयोगाने यासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी केले असून, माहिती ९ जुलैपर्यंत PDF स्वरूपात आयोगाला ई-मेलद्वारे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

ईव्हीएम तपासणी, मनुष्यबळ आणि गोदाम व्यवस्था महत्त्वाची :
या निवडणुकांमध्ये(Election) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हानिहाय EVM यंत्रांची उपलब्धता, त्यामध्ये वापरण्यात येणारे कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) व डिजीटल मेमरी मॉड्यूल (DMM) यांची संख्या तपासून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, EVM यंत्रांच्या FLC चाचणीची तारीख निश्चित करून, ती यंत्रे गोदामात कशा सुरक्षितपणे ठेवली आहेत, याचा तपशील आयोगाला द्यावा लागणार आहे. नवीन यंत्रांची आवश्यकता असल्यास त्यासाठी लागणारी जागा आणि खर्च याचाही आढावा घेण्यास सांगितले आहे.

जिल्हास्तरावर प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता :
EVM यंत्रांसाठी आवश्यक प्रशिक्षक (मास्टर ट्रेनर्स) उपलब्ध आहेत का, याची खात्री करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जर मनुष्यबळ अपुरे असेल, तर विभागीय आयुक्तांकडे तातडीने पूर्ततेची मागणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

या निवडणुकांसाठी जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभी करावी लागणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक निवडणूक प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं