एसटीचं चाक ‘खड्यात’ गेलेलं… आता ‘वर’ काढण्यासाठीच भाडे वाढ!

“वाट पाहीन पण एसटीने(ST) जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे ओढा असतो.

पण आता या संख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एसटीची(ST) तब्बल 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय झाला आहे. शनिवारपासून ही भाढेवाढ लागूही केली आहे. या निर्णयामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्‍यांवर आर्थिक ताण येणार हे नक्की आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर मोठी टीका केली आहे. पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला प्रतिदिन तीन कोटी रुपये नुकसान होते, डिझेलचा खर्च, मेन्टेन्सचा खर्च वाढला आहे ही आणि अशी विविध कारणे देत भाडे वाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. मासिक उत्पन्न आणि खर्च यांचे गणित जुळत नाही, एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीला दिवसाला तीन कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भाडे वाढ अपरिहार्य आहे. पण एसटीची ही अशी स्थिती का झाली हे सुरूवातीला पाहू…

दररोज 55 लाख प्रवासी एसटीचा प्रवास करतात. याद्वारे महामंडळाला प्रतिदिन जवळपास 23 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. पण यामध्ये सवलतीच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. एसटीमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना, 75 वर्षांपर्यंतच्या महिलांना आणि 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ पुरुषांना 50 टक्के सवलत आहे. याशिवाय विद्यार्थी आणि नोकरदारांचे मासिक पास, विविध पुरस्कार्थी, अंध व अंपग व्यक्ती, विविध आजारांनी ग्रासलेले रूग्ण अशा जवळपास तीन डझन सवलती दिल्या जातात.

या सवलतींमुळे प्रवासी वाढल्याचा दावा सरकारकडून केला जातो. जो खराही आहे. पण त्यामुळे वाढलेली सवलतीची रक्कमही लक्षात घ्यायला हवी. 2022-23 मध्ये 22 कोटी 35 लाख सवलतीच्या प्रवासाचे लाभार्थी होते. या सवलतीची रक्कम 1575 कोटी रुपये होती. हीच संख्या 2023-24 मध्ये वाढून 89 कोटी 36 लाख प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतला होता. या सवलतीची रक्कम तब्बल चार हजार अकरा कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात एसटीच्या 31 पैकी 20 विभागांनी नफा कमवला होता. पण 11 विभाग तोट्यात होतेच.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का: बड्या नेत्याने सोडली साथ

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली

ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video