मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आता सरकार…

कोल्हापूर : एकीकडे राज्याचा विकास तर दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या तसेच लाडकी बहीण, शेतकरी, महिला, कष्टकरी यांच्या पाठबळांबरोबरच करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कृपेने राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. अशी प्रित्कीया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात(kolhapur) दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात(kolhapur) सदिच्छा भेट देऊन करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन झाला होता. त्यामुळे कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो असे सांगून दावोस येथे झालेल्या करारामुळे राज्यात १५ लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

साडेसात लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक होणार आहे. अनेक उद्योग महाराष्ट्रात आकर्षित होत आहेत. विरोधक यावर टीका करत असले तरी टिकेला आम्ही कधीच उत्तर देणार नाही. आम्ही आमचे काम दाखवणार असे शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारची जी मागील भूमिका होती. तीच भूमिका कायम राहणार आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते पण महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही. आणि तेच कोर्टात गेलेले आहेत परंतु आमच्या सरकारने दिलेले आरक्षण हे कुठल्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले आहे. त्यामुळे हे टिकणारच, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

शरद पवारांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

पुढील काही दिवस तापमानात वाढ, कोरडी हवा जाणवेल IMDचा इशारा

तर जागीच गेला असता जीव! तरुणांनी गॅस स्टोव्हवर केलं असं काही…; VIDEO पाहून उडेल थरकाप