सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन(Pension) मिळत नसल्याने अनेकांना भविष्याची चिंता सतावत असते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. एका सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही निवृत्तीनंतर केवळ पेन्शनच नाही तर कोट्याधीश देखील होऊ शकता.
ही योजना म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे. या योजनेत योग्य आर्थिक नियोजन करून गुंतवणूक केल्यास महिन्याला १ लाख रुपये पेन्शन(Pension) सहज मिळवता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक निवृत्ती योजना आहे. यामध्ये कोणताही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी गुंतवणूक करू शकतो. ही योजना शेअर बाजाराशी संलग्न असून, गुंतवलेले पैसे शेअर बाजारातील विविध शेअर्समध्ये गुंतवले जातात. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेअर बाजाराशी निगडित असल्याने या योजनेत थोडीफार जोखीम असते. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास हा धोका नगण्य ठरतो.
या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून एनपीएस खाते उघडता येते. निवृत्तीनंतर एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते, तर उर्वरित ४० टक्के रक्कम पेन्शन योजनेत गुंतवली जाते आणि त्यातून मासिक पेन्शन(Pension) दिली जाते. जर एकूण जमा झालेली रक्कम ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर संपूर्ण रक्कम एकरकमी काढता येते. विशेष म्हणजे ही संपूर्ण बचत करमुक्त असते.
एनपीएस योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, पुढील २० वर्षांसाठी दरमहा २० हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दरवर्षी ही रक्कम १० टक्क्यांनी वाढवत नेणे गरजेचे आहे. जर गुंतवणुकीवर सरासरी १० टक्के परतावा गृहीत धरला, तर २० वर्षांनंतर एकूण गुंतवणूक सुमारे ३ कोटी २३ लाख रुपये इतकी होईल.
यापैकी ६० टक्के रक्कम म्हणजेच सुमारे १.८५ कोटी रुपये एकरकमी मिळतील. तर उर्वरित ४० टक्के रक्कम म्हणजेच सुमारे १.३७ कोटी रुपये पेन्शन योजनेत गुंतवले जातील. या रकमेतून दरमहा १ लाख रुपये पेन्शन सहजपणे मिळू शकते.
हेही वाचा :
शरद पवारांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
तर जागीच गेला असता जीव! तरुणांनी गॅस स्टोव्हवर केलं असं काही…; VIDEO पाहून उडेल थरकाप
मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आता सरकार…