उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; तिसऱ्या उपमुख्यमंत्रीपदासाठी…

पुणे : तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांविषयी विजय वडेट्टीवार यांनी सुरुवात केली, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत(political news) स्वतः चा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता. त्यांना वाटत असेल की मी यात आडकाठी करेन म्हणून कोणाची बदनामी करायची? कुणामार्फत कोण गेला कोणाशी चर्चा झाली, याची मला माहिती आहे, पण मी काही एथिक्स पाळतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केला.

विश्व मराठी संमेलनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, तिसऱ्या उपमुख्यमंत्री(political news) पदाबाबत सुरुवात ही वड्डेटीवार यांनी केली होती. मग, कोणाची बदनामी करायची म्हणून माझे नाव घेतले गेले. ते कोणाशी बोलले ती सगळी माहिती माझ्याकडे आहे तेवढी इतर कोणाकडेच नाही. त्यामुळे माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतः चा अस्त झाला आहे त्यांनी स्वतःचा उदय करू नये. महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट झाले पाहिजेत.

पुढे बोलतांना सामंत म्हणाले, अनंत अंबानी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंबानी समूह 3 लाख 5 हजार कोटींची गुंतवणूक दावोसच्या माध्यमातून महाराष्ट्रात करणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या विमानातून फिरण्यापेक्षा त्यांनाच गुंतवणूकीबद्दल विचारावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राज्याचे नाव मोठे होत असल्याने काही लोकांना पचत नाही. त्यांचा जळफळाट, होत आहे. त्यांच्याकडून फेक नरेटीव्ह सेट केले जात आहे. त्यांना दावोसला जायला मिळाले नाही म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. मला त्यांच्या पत्रकार परिषदेवर बोलून त्यांना मोठे करायचे नाही.

ज्यांच्य सोबत करार झाले त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. दावोस हा जागतिक स्तरावरील प्लॅटफॉर्म आहे. त्या दौऱ्यावर झालेला संपूर्ण खर्च आम्ही घोषित करणार आहोत. 4 वर्षांपूर्वी जे गेले होते त्यांचे पुढे काय झाले. त्या कंपन्यांचे काय झाले, असा प्रश्नही सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

हिंदी चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर जातोय ही आनंदाची बाब आहे. त्या चित्रपटाविषयी काही आक्षेप असेल तर तो चित्रपट विद्वानांना दाखवावा. त्यात खरोखरच काही आक्षेपार्ह असेल तर निर्णय घ्यावा. चित्रपट प्रदर्शित करू नये, असे मी म्हणालो नाही, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा!

थोडीशी हुशारी पडू शकते महागात! 2 वर्षांसाठी बोर्ड परीक्षा होईल बंद

Champions Trophy च्या आधी रोहित शर्मा पुन्हा ब्रेकवर, घेतला धक्कादायक निर्णय