बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चित असलेले जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ(couple) यांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी पहिल्या मुलाचे जगात स्वागत केले. या आनंदाच्या बातमीने चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्री जल्लोष करतेय. हा छोटा राजकुमार जगात पाऊल टाकताच किती कोटींचा मालक बनलाय? पालकांकडून किती संपत्ती त्याला वारशाने मिळेल? याचा आकडा जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

कतरिना कैफ ही एका सिनेमासाठी साधारण 10 ते 12 कोटी रुपये फी घेते. इंडस्ट्रीतली ती टॉप अभिनेत्री आहे. तिचे मासिक उत्पन्न 3 कोटी, तर वार्षिक 30 कोटींहून अधिक आहे. 2019 मध्ये लाँच केलेला ‘के ब्यूटी’ ब्रँड आज 224 कोटींच्या बाजारमूल्याचा झाला. मुंबईत वांद्रे येथे 8.2 कोटींचा 3 बीएचके, लोखंडवाला येथे 17 कोटींची प्रॉपर्टी आणि लंडनमध्ये 7 कोटींचा बंगला आहे. तिचे एकूण नेट वर्थ जवळपास 240 कोटी रुपये आहे. कतरिनाला आईकडून सर्वाधिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

विकी कौशलने ‘मसान’सारख्या छोट्या बजेट चित्रपटापासून सुरुवात केली. ते ‘छावा’साठी 10 कोटी, ‘डंकी’साठी 12 कोटी घेतले. ब्रँड एंडोर्समेंट्समधून २-३ कोटी प्रति डील. वार्षिक कमाई 30-40 कोटी. सध्याची एकूण संपत्ती 140 कोटींच्या घरात. ‘छावा’ने 790 कोटींचा व्यवसाय करून विकीला सुपरस्टार बनवले.जोडप्याकडे दोन रेंज रोव्हर (3.28 कोटी + 2.32 कोटी), मर्सिडीज जीएलई (1.15 कोटी), ऑडी क्यू७ (90 लाख) आणि बीएमडब्ल्यू 5जीटी (88 लाख). मुंबईत जुहू येथे सी-फेसिंग आलिशान फ्लॅट (मासिक भाडे 18 लाख) आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी-कतरिना यांची एकत्रित मालमत्ता सुमारे 370 कोटी रुपये आहे. म्हणजे जन्मताच हा छोटा पाहुणा कोट्यवधींचा मालक बनलाय(couple).

कतरिनाकडे 240 कोटी, विकीकडे 140 कोटी म्हणजे आईकडे जवळपास दुप्पट संपत्ती आहे. पण दोघे मिळून मुलाला अब्जाधीश बनवणार आहेत. 2021 मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याने चार वर्षांत कुटुंब पूर्ण केले. चिमुकल्याच्या जन्मानंतर प्रियांका चोप्रा, अर्जुन कपूर, कियारा अडवाणीपासून सर्वांनी विकी-कतरिनाला शुभेच्छा दिल्या. 2025 चा सर्वात मोठा सेलिब्रिटी बेबी असल्याचे म्हटले जातेय.

हेही वाचा :

कुणाला नकोसे झाले आहेत मनोज जरांगे पाटील…..?
अजित पवार- पार्थ पवारांचे टेन्शन वाढणार…
भारत-ऑस्ट्रेलिया पाचवा T20 सामना मोफत कसा पाहता येईल