आजकाल स्मार्टफोन वापरताना सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरी लवकर संपणे. (battery)तुम्ही कितीही चांगली बॅटरी असलेला फोन घेतला तरीही काही अॅप्स तुमच्या बॅटरीचा पुरेपूर वापर करून तिला वेगाने संपवतात. अनेकांना वाटते की बॅटरी खराब झाली आहे, पण खरं कारण असतं – तुमच्या फोनमधील काही बॅटरी-हंग्री Battery Hungry अॅप्स!
हे 10 अॅप्स सर्वाधिक बॅटरी वापरतात:
1. Fitbit – फिटनेस ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध असलेलं हे अॅप बॅकग्राउंडमध्ये सतत डेटा ट्रॅक करत राहतं.
2. Uber – लोकेशन ट्रॅकिंगमुळे हे अॅप खूप बॅटरी वापरतं.
3. Skype – सतत इंटरनेट कनेक्शन वापरत असल्यामुळे बॅटरी वेगाने संपते.
4. Facebook – सतत बॅकग्राउंडमध्ये चालू राहून नोटिफिकेशन्स पाठवत राहतं.
5. Airbnb – प्रवास आणि बुकिंगसाठी लोकप्रिय (battery)असलेलं हे अॅप बॅकग्राउंडमध्ये बरीच बॅटरी वापरतं.
6. Instagram – सतत डेटा आणि मीडिया लोड करत असल्याने बॅटरी झपाट्याने कमी होते.
7. Tinder – लोकेशन आणि नोटिफिकेशन्समुळे हे अॅप बॅटरीचा मोठा वापर करतं.
8. Bumble – Tinder प्रमाणेच, सतत चालू राहिल्याने बॅटरी लवकर संपते.
9. Snapchat – कॅमेरा आणि लोकेशन ट्रॅकिंगमुळे बॅटरीचा वेगाने वापर होत राहतो.
10. WhatsApp – सतत नोटिफिकेशन्स आणि चॅट्स अपडेट करत असल्याने बॅटरी कमी होते.
तुमच्या फोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
बॅकग्राउंड अॅप्स बंद करा – सेटिंग्जमध्ये जाऊन गरज (battery)नसलेल्या अॅप्सची बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी बंद करा.
लोकेशन सेवा बंद ठेवा – केवळ आवश्यक तेव्हाच GPS किंवा लोकेशन ट्रॅकिंग चालू ठेवा.
बॅटरी ऑप्टिमायझेशन वापरा – Android किंवा iPhone सेटिंग्जमध्ये बॅटरी सेव्हिंग मोड ऑन करा.
नोटिफिकेशन्स मर्यादित करा – अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद केल्याने बॅटरी टिकू शकते.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत