होळी खेळायची आहे परंतू केस खराब होण्याची भीती आहे ? अशी घ्या काळजी

भारतात इतर सणांसारखाच होळीचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला (celebrated)जातो. होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जातो.मराठी महिन्यानुसार फाल्गून महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्सहाने साजरा केला जातो. आजच्या कॅमिकलयुक्य जगात खूप वस्तू या भेसळयूक्त असतात व शरीरासाठी घातक ठरतात. होळीला बाजारात मिळणारे कॅमिकलयुक्त रंगही आपल्या केसांसाठी खुप हानिकारक ठरु शकतात. या कॅमिकलयुक्य रंगांनी होळी खेळल्यास केस मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतात. एक दिवसाची मज्जा आणि केसांना मोठी सजा.

तस तर मुल होळीच्या दिवशी हेअर केअर करतात परंतू केस हा मुलींचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्यांना केस मजबूत, सूंदर, मुलायम हवी असतात म्हणून ते खूप महागड्या गोष्टी करत असतात आणि होळी मुळे केसांवर परीणाम होऊ शकतो पण जर तूम्हालाही तूमचे केस डॅमेज होण्यापासून वाचवायचे आहेत त्यांना तूटण्यापासून वाचवायचे आहे आणि मनसोक्त होळी खेळायची आहे तर हे काही घरगुती, सोपे उपाय नक्की करुन पाहा.

१. होळी खेळताना केस मोकळी ठेवण टाळा चित्रपट, मालीका व सोशीयल मिडीयावरुन प्रेरीत होऊन अनेक जण वीडीओ, व्लॅाग, फोटोच्या नादात केस मोकळी सोडुन होळी खेळतात परंतू यामुळे रंग केसात खालवार शिरतो व केस अधीक प्रमाणात खराब होतात. त्यामुळे केस मोकळी ठेवण्या ऐवजी (celebrated)केसांची घट्ट वेणी किंवा अंबडा घातलेला चांगला. शक्य असल्यास केस टोपी किंवा स्कार्फ ने ढाकून होळी खेळा

२. होळी खेळण्यापूर्वी केसांना तेल लावा केस कोरडे असले की रंग घट्ट पणे केसात बसतो त्यामुळे होळी खेळण्याच्या काही तास आधी केसाला बदाम अथवा खोबरेल तेल लावा, ज्यांनी रंग मुळांपर्यंत पहोचणार नाही व रंग निघायला प्रॅाब्लेम होणार नाही.

३. होळी खेळण्याच्या आधी केसांवर लेअर तयार करा. होळी खेळण्याच्या आधल्यावर रात्री केसांना कंडीशनर लाऊन धुआ आणि त्यावर सिरम लावा यामुळे केस अधीक मुलायम होतील, केसांवर एक लेअर बनायला मदत होईल व रंग केसात खोलवर चिटकू देणार नाही.

होळीनंतर जर केस कोरडे फ्रीजी झाली तर. घरगुती “हेअर मास्क” (celebrated) लावने उत्तम ठरेल.होळी नंतर केस आधीच डॅमेज झालाली असतात त्यामुळे होळी नंतर केस धुताना कधीही नैसर्गीक पद्धतीने केस धुने चांगले.असा बनवा घरगुती हेअर मास्क १. एक पिकलेले केळे मॅश करुन त्यात दोन चमचे दही मिसळा २. मिश्रन केसांना लावा. १०-१५ मी. साठी लाऊन ठेवा ३. मग केस कोमट पाण्याने धून टाका केस धूताना त्यात शिकेकाई मिसळेली ऊत्तम राहिल

होळी हा आनंदाचा सण आहे, पण त्याच्या धामधुमीत आपण आपल्या केसांची काळजी घ्या, होळी खेळण्याच्या वेळेस, आधी आणि नंतर योग्य ती काळजी घ्या, केसांना घट्ट बांधा, सौम्य शॅम्पू व घरगुती हेअर मास्कचा वापर करा.तर मग, या वर्षी होळीच्या धम्मालसोबत केसांची योग्य काळजी घेण्याचेही नक्की लक्षात ठेवा!

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी

चांदीचा ग्राहकांना चकमा, सोन्यासह घेतली भरारी, काय आहेत किंमती?

आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…

पहिला दिवस विरोधकांचा! विषय मंत्र्यांच्या राजीनाम्याचा