चवीला कडू असणारी मेथी भाजी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना खायला आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण मेथीची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात(breakfast). त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेथीच्या भाजीपासून चविष्ट आणि कुरकुरीत पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

सकाळच्या नाश्त्यात(breakfast) किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. मेथीच्या पुऱ्या आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा इतर वेळी खाण्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीच्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
- मेथी
- गव्हाचं पीठ
- मीठ
- ओवा
- लाल तिखट
- हिरवी मिरची
- ज्वारीचे पीठ
- बेसन
- हळद
- जिरं
कृती:
- मेथीच्या चविष्ट पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीची भाजी स्वच्छ साफ करून नंतर पाण्याने धुवून घ्या. धुवून घेतलेली भाजी बारीक चिरून घ्या.
- मोठ्या ताटात बेसन, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
- नंतर त्यात लाल तिखट, हळद, ओवा, जिऱ्याची पावडर, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करा.
- मिक्स करून घेतलेल्या त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
- मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटा आणि कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
- तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या मेथीच्या पुऱ्या.
हेही वाचा :
पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी
इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी