ज्येष्ठ नागरिकांना धक्का.. स्टेट बँक ऑफ इंडियाने FD वरील व्याजदर घटवले; आजपासून नवे दर लागू

भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अल्पकालीन फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी केले आहेत. (senses)सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना किती व्याजदर मिळेल ते जाणून घेऊ.

भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयने अल्पकालीन फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर कमी केले आहेत. आजपासून नवीन फिक्स्ड डिपॉझिट दर लागू झाले आहेत. 40 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी(senses) कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 15 बेसिस पॉइंटने कमी करण्यात आले आहेत.
कोणत्या कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर किती व्याज मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडियाचा फिक्स्ड डिपॉझिटवरील नवा दर

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने तीन शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 15 बेसिस पॉइंटने कमी केले आहेत.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने सामान्य नागरिकांसाठी 40 दिवसांपासून (senses)ते 179 दिवसांच्या कालावधीसाठीचा व्याजदर 5.05% वरून 4.90% पर्यंत कमी केला आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 दिवसांपासून 210 दिवसांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 5.80% वरून 5.65% पर्यंत कमी केला आहे.
  • तसेच, 211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी, बँकेने सामान्य नागरिकांसाठी व्याजदर 6.05% वरून 5.90% पर्यंत कमी केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेवींचा दर 15 बेसिस पॉइंटने कमी केला आहे.

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींचा व्याजदर 5.55% वरून कमी केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता हा दर 5.40% असेल.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने 180 दिवस ते 210 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 6.30% वरून 6.15% पर्यंत कमी केला आहे.
  • बँकेने 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदर 6.55% वरून 6.40% पर्यंत कमी केला आहे.

हेही वाचा :

महेंद्रसिंग धोनीचा हा शर्ट आहे iPhone पेक्षाही महाग, किंमत ऐकाल तर हैराण व्हाल

उत्तराखंडला टक्कर देणारे महाराष्ट्रातील छुपं पर्यटनस्थळ! सातपुडा पर्वत रांगेतील तोरणमळा

समोसा-जलेबीवरही ‘सिगारेटसारखी’ आरोग्य चेतावनी; नागपूरच्या दुकानांमध्ये लावले जाणार फलक