महाराष्ट्रातील मराठी-हिंदी (Marathi-Hindi)वाद हा अलीकडील काळात चर्चेचा विषय ठरलाय. हा वाद प्रामुख्याने भाषिक अस्मिता, स्थानिक संस्कृती आणि राजकीय हितसंबंधांभोवती केंद्रित आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रीभाषा धोरण लागू करण्याच्या निर्णयापासून सुरू झाला. ज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रस्ताव होता. याला स्थानिक मराठी भाषिकांनी विरोध केला. यातून अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आणि वाद निर्माण झाले. दरम्यान आता या वादत अभिनेत्री रेणूका शहाणेनी उडी घेतलीय. काय म्हणाल्या रेणूका शहाणे?

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिंदी आणि मराठी(Marathi-Hindi) भाषेचा वाद आता अधिकच तीव्र होत चाललाय. याच मुद्द्यावरुन जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि 2 ठाकरे बंधुंना एकत्र आणलं असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचेही नाव त्यात समाविष्ट झाले आहे.
रेणुका यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झालाय आणि त्यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीतही खूप काम केलंय. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची राज्यभरात चर्चा आहे. रेणुका शहाणे यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केलंय. हिंसाचारापेक्षा सुसंवाद असावा असे रेणूका शहाणे म्हणाल्या. अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आणि सुप्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही हिंदी-मराठी भाषेच्या वादावर आपले मत मांडले होते.
हिंदी-मराठी(Marathi-Hindi) भाषेतील वादावर रेणुका शहाणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. पूजा चौधरीच्या पॉडकास्टमध्ये त्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलत होत्या. ‘जर तुम्ही खूप काळापासून एखाद्या ठिकाणी राहत असाल, तर स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृती समजून घेणे आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तिचा आदर करणे ही चांगली गोष्ट आहे. ते फक्त बोलण्याबद्दल नाही तर तिचा आदर करणे अपेक्षित आहे. ज्यांना स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीबद्दल सहानुभूती नाही, अशी लोक मला आवडत नसल्याचे रेणूका शहाणे म्हणाल्या.

‘दोन किंवा तीन जणांना कानाखाली मारल्याने कोणाचाही फायदा होत नाही’, असे यावेळी रेणुका म्हणाल्या. ‘मला हिंसाचार अजिबात आवडत नाही. लोक त्याबद्दल असंस्कृत होतात हे मला आवडत नाही. जिथे मराठी बोलली जात नाही अशा ठिकाणी जाऊन फक्त 2-3 लोकांना कानाखाली मारणे… यामुळे भाषेचा फायदा होणार नाही’, असेही त्या पुढे म्हणाल्या.
रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनीही अलीकडेच हिंदी-मराठी भाषेच्या वादावर भाष्य केले होते. ‘भाषा हा संवादाचा विषय आहे असे मला वाटते. तो कधीही वादाचा विषय नसतो. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे त्याने सर्वकाही स्वीकारले आहे आणि संवादावर विश्वास ठेवला आहे. भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही’, असे आशुतोष राणा एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसातच रेणूका शहाणेंची प्रतिक्रिया आलीय.
हेही वाचा :
“पुन्हा एकदा गणपती खड्डयांतून आणावे लागणार, विकासाच्या नावाखाली राणेंनी….”
प्रसिद्ध कंपनीचे CEO आणि HR यांच्या कॉन्सर्टमधील ‘त्या’ व्हिडीओने जगभरात खळबळ!
मोठी बातमी! अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार