देशात अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांचा स्वतःच असा (history)इतिहास आणि महत्त्व आहे. त्यातच आज आम्ही तुम्हाला आंध्र प्रदेशमधील एका अशा मंदिराची माहिती सांगत आहोत जेथील स्तंभ हे हवेत लटकलेले आहेत.

भारतात अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांचा स्वतःचा असा इतिहास (history)आहे. प्रत्येक मंदिराची आपली अशी खासियत असते आणि अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एक मंदिराची माहिती सांगत आहोत ज्याचे खांब जमिनीला नाही तर हवेत लटकलेले आहेत. भारत आपल्या प्राचीन मंदिरं आणि अद्वितीय स्थापत्यकलेसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. अशाच प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात वसलेलं “लेपाक्षी मंदिर”. हे मंदिर आपल्या असामान्य वास्तुरचनेसाठी ओळखलं जातं, पण याची सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे “हवेतील खांब”. होय, या मंदिरात असा एक खांब आहे जो जमिनीला स्पर्श करत नाही, तो हवेत लटकलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचं महत्त्व आणि या हवेतील खांबामागचं गूढ.

लेपाक्षी मंदिराचं बांधकाम १६व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या (history)काळात करण्यात आलं होतं. असं मानलं जातं की, या मंदिराची निर्मिती विरुपन्ना नावाच्या व्यक्तीने आपल्या भावासोबत मिळून केली होती, जो तिथल्या राजाकडे नोकरी करत होता. एक दुसरी मान्यता अशी आहे की, या मंदिराचं बांधकाम ऋषी अगस्त्यांनी केलं होतं. हे मंदिर भगवान शिव (विशेषतः त्यांचा रौद्र अवतार वीरभद्र) आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. असं मानलं जातं की इथे एक स्वयंभू शिवलिंग आहे, ज्याला वीरभद्राचं रूप मानलं जातं. मंदिराच्या परिसरात सुंदर शिल्पकाम, कोरीव खांब आणि भित्तीचित्रं आहेत, जी विजयनगरकालीन कलेचे उत्कृष्ट उदाहरण मानली जातात.
या मंदिराच्या मुख्य सभागृहात एकूण ७० खांब आहेत, पण त्यामध्ये एक असा खांब आहे जो जमिनीला बिलकुल स्पर्श करत नाही. हा खांब थोडासा वर उचललेला आहे आणि त्याच्या खाली सहजपणे कापड किंवा धागा घालता येतो. स्थानिक श्रद्धेनुसार, या खांबाला हात लावल्यास शुभफल प्राप्त होतं. या हवेतील खांबाचं रहस्य समजून घेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु आजपर्यंत कोणीही याचं उत्तर शोधू शकलं नाही. ब्रिटिश काळातही काही अभियंत्यांनी हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. एका ब्रिटिश आर्किटेक्टने सिद्धांत मांडला की मंदिराचा सर्व भार इतर ६९ खांबांवर आहे, त्यामुळे एक खांब हवेत असल्याने काही फरक पडत नाही.
पण जेव्हा या सिद्धांताची तपासणी झाली, तेव्हा समोर वेगळंच वास्तव आलं. अभ्यासातून असं समोर आलं की, मंदिराचा सर्वात मोठा भार याच हवेत असलेल्या खांबावर आहे. तरीही तो खांब जमिनीला स्पर्श करत नाही. या अनोख्या स्थापत्यशास्त्राच्या समोर शेवटी ब्रिटिश तज्ज्ञांनीही हार मानली. या खांबावरून एक गोष्ट स्पष्ट होते – की हे मंदिर विज्ञान आणि श्रद्धेचं एक विलक्षण मिश्रण आहे, जे पाहणाऱ्याला थक्क करतं. मंदिराच्या आवारात एक विशाल नंदीची मूर्तीही आहे, जी भगवान शिवाच्या वाहनाचं प्रतीक आहे. विशेष म्हणजे, ही मूर्ती एका एकसंध खडकात कोरलेली असून भारतातील सर्वांत मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक मानली जाते.
हेही वाचा :
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Punch CNG होईल तुमची ! किती असेल EMI?
कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १९ ते २५ जुलै २०२५ – मराठी राशी भविष्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘या’ गंभीर आजाराने ग्रासले, व्हाईट हाऊसने केला खुलासा