रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचे करोडो युजर्स आहेत. इंस्टाग्रामवर(Instagram) त्यांच्या युजर्ससाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. हे फीचर युजर्सना एक चांगला अनुभव देण्यासाठी लाँच करण्यात आले आहेत. इंस्टाग्राम सुरु झाल्यापासून आतापर्यंत प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

रिल्स अपडेट, पोस्ट अपडेट, AI, प्रोफाईल अपडेट, नोट्स फीचर, लाईक्स आणि कमेंट्स ऑप्शन, असे अनेक फीचर्स इंस्टाग्रामवर अपडेट करण्यात आले आहेत. आता देखील कंपनीने आणि Mark Zuckerberg ने इंस्टाग्रामने युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याची तयारी केली आहे.

इंस्टाग्रामवरील(Instagram) सर्वांचं आवडतं फीचर म्हणजे रिल्स. इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स त्यांच्या रिल्स शेअर करत असतात. प्रत्येक क्रिएटर्सचा रिल्स कंटेट वेगळा असतो. त्यामुळे लोकं त्यांच्या आवडीनुसार क्रिएटर्सना फॉलो करतात आणि रिल्स बघतात. पण रिल्स बघताना नवीन रिल्स बघण्यासाठी आपल्याला सतत पुढे पुढे स्क्रोल करावं लागतं.

पण एका क्षणाला आपण स्क्रोल करून करून वैतागतो आणि आपल्याला असं वाटतं की असं एखादं फिचर असावं ज्यामुळे आपोआप रिल्स स्क्रोल होऊ शकतील. तुम्हाला देखील असंच वाटतं का, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Mark Zuckerberg आणि मेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर म्हणजे ऑटो स्क्रोल फीचर.

नव्या फीचरमुळे आता सतत रिल्स स्क्रोल कराव्या लागणार नाहीत. व्हिडीओ संपल्यानंतर रिल आपोआप पुढे स्क्रोल होणार आहे. कंपनीने हे फीचर रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्ससाठी, पोस्टवरील तीन डॉटवर टॅप केल्यावर हा पर्याय दिसून येतो. एकदा सक्षम झाल्यानंतर, कंटेट ऑटोमॅटिकली प्ले होईल आणि कोणत्याही स्वाइपिंगची आवश्यकता न पडता पुढील पोस्टवर जाईल. अनेक युजर्स या नव्या फीचरसाठी उत्सुक आहेत. मात्र अनेकांनी हे नवीन फीचर नाकारलं आहे.

नवीन फीचर टिकटॉक आणि यूट्यूबवरील वैशिष्ट्य प्रतिबिंबित करते, ज्यामुळे अधिक निष्क्रिय, लीन-बॅक पाहण्याचा अनुभव मिळतो. यामुळे कंटेट क्रिएटर्स आणि ब्रँडसाठी अधिक व्ह्युज मिळू शकतात, कारण युजर्सना आता कंटेटमधून मॅन्युअली स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. तथापि, हे पूर्णपणे सकारात्मक असू शकत नाही, कारण ते अधिक डूम स्क्रोलिंगला प्रोत्साहन देऊ शकते. तरीही, युजर्सना हा पर्याय देणे इंस्टाग्रामचे एक मोठे यश मानले जात आहे.

अनेक युजर्स आधीपासून या फीचर्सची वाट बघत होते. मात्र या फीचर्समुळे समस्या अधिक वाढू शकतात, असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. या नवीन फीचरमुळे इंस्टाग्रामची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे फीचर भारतातील युजर्ससाठी कधी लाँच केलं जाणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

हेही वाचा :

 भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

लॉर्ड्‌सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना