आरजे महावश, युजवेंद्र चहलचा लंडनमधला ‘तो’ खास व्हिडीओ व्हायरल

गेल्या बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीसोबतच क्रिडा विश्वातही घटस्फोटांचं सत्र सुरू आहे. अशातच बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला घटस्फोट म्हणजे, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा. दोघांचा ऑफिशिअली घटस्फोट झाला, पण तरीसुद्धा युजवेंद्र चहल चर्चेत आहे, तो त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे. आतातर दोघांचा एक व्हिडीओ(video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अनेकदा आरजे महावश युजवेंद्र चहलसोबत क्रिकेट सामन्यांमध्ये आणि क्रिकेटशी संबंधित पार्ट्यांमध्ये स्पॉट झालीय. पण, आता सध्या दोघांचे लंडनमधले फोटो समोर आल्यापासून चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं(video) संपूर्ण सोशल मीडिया हादरवून सोडलं आहे.

युजवेंद्र चहल आणि आरजे महावशनं लंडनमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केल्यानंतर, आता दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोघांच्या अफेअरची चर्चा आणखी वाढली आहे. व्हिडिओमध्ये दोघे एकत्र फिरताना दिसतायत.

सोशल मीडियावर सध्या आरजे महावश आणि युजवेंद्र चहलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका ट्रॅव्हल ब्लॉगरनं आपला व्लॉग शूट करताना युझी आणि आरजे महावशला हेरलं आणि लगेचच व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.

ज्यात युजवेंद्र चहल आणि आरजे महवश लंडनच्या रस्त्यांवर अगदी निवांतपणे एकत्र चालताना दिसतायत. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेसाठी युजवेंद्र सध्या यूकेमध्ये आहे. त्यातच आरजे महवशचं तिथे असणं आणि लंडनच्या रस्त्यावर दोघांचं एकत्र फिरणं नेटकऱ्यांच्या नजरेत भरलं आहे. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय.

काही दिवसांपूर्वी आरजे महावशनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये युजवेंद्र चहलचा एक खास फोटो स्टोरीवर पोस्ट केला होता. यात युजवेंद्र चहलनं खास व्हाईट टी-शर्ट, डेनिम पॅन्ट आणि हातात काळं जॅकेट घेऊन कॅज्युअल अंदाजात फोटो सेशन केलं होतं. या फोटोमध्ये आरजे महावशनं ‘LOL’ असं कॅप्शन दिलेलं.

आरजे महावशनं कॅप्शन दिलेलं की, “शेवटी यूकेमध्ये ‘बनावट ॲक्सेंट नसलेल्या हिंदुस्थानी चेहऱ्या’सोबत शूटिंग करण्याचा योग आला!” त्यापुढे महावशनं एक गमतीशीर कॅप्शन लिहिलं. त्यात तिनं म्हटलेलं की, “एक रँडम मुलगा युझीकडे आला आणि त्याला विचारलं, ‘तुमचं स्कीनकेअर रूटीन काय हाहाहा?’… युझी तिथे बसून लाजत होता.”

हेही वाचा :

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर

कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

‘लग्नात अक्षतांऐवजी वाटल्या झाडांच्या बिया’; उंडाळ्यात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा संदेश