धाराशिव शहरातील ‘रील स्टार’ भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं दोन दिवसांपूर्वी अपहरण करून चालत्या गाडीत बेदम मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही शहरातील पोलिसांनी अद्याप आरोपींवर गुन्हा (crime)दाखल केलेला नाही ही बाब चक्रावून टाकणारी ठरत आहे.

नागेश मडके यांनी मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी झालेल्या मारहाणीबाबत स्पष्टपणे आरोप केला की, शहर पोलीस ठाण्याचा वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांच्यावर झालेल्या मारहाणीबाबत आरोपीवर अद्याप गुन्हा नोंदवला जात नाही. उलट बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठीच तक्रार केली जात आहे म्हणून गुन्हा(crime) नोंदवू नका असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नागेश मडके यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी फक्त अदखलपात्र तक्रार नोंदवून माझ्यावर झालेल्या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे पण शहरातील पोलिस गप्प आहेत. असं म्हणत नागेश मडके यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागेश मडके यांनी कुटुंबीय व बॉडीगार्डसह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. तिथे त्यांनी जर लवकरात लवकर माझ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर गुन्हा(crime) नोंदवला नाही तर माझ्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नागेश मडके यांच्या या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. नागेश मडके यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा तपास, आरोपींचा शोध व त्यांच्यावरील पुढील कारवाईबाबत पोलिसांनी मौन बाळगल्याने स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी संध्याकाळी 7 ते 7:15 च्या दरम्यान नागेश मडके त्यांच्या हॉटेलसमोर उभे होते. त्याच क्षणी एक चारचाकी गाडी तिथे थांबली. त्यात बसलेल्या लोकांनी मडके यांना सांगितले की त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा आहे. मडके त्यांच्याकडे पोहोचताच त्यांनी मडके यांना गाडीच्या खिडकीतून बोलण्यासाठी बोलावले आणि अचानक त्यांना खिडकीत अडकवले. यानंतर त्यांनी मडके यांना जबरदस्तीने गाडीत ओढत नेऊन त्यांना मारहाण केली. त्यांना गाडीतून लटकवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा :
लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी!
बिग बॉसचे काऊंटडाऊन सुरू, सलमान खानच्या शो चा पहिला लुक समोर, बदलला Logo