गोडवा राखणाऱ्या या सणात, गोड गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याने (festival)भाऊ–बहीणीच्या नात्यात अजून गोडी भरा! चला कमी साहित्यापासून तयार केला जाणारा हा गव्हाच्या पिठाचा शिरा घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

भावाचे औक्षण करतानाही ताटात गोडाचा एक तरी पदार्थ ठेवावाच लागतो (festival)अशात तुम्ही झटपट तयार होणारे आणि चवीला स्वादिष्ट लागणारा मऊसर असा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार करू शकता. हा शिरा पारंपरिक आणि पौष्टिक पर्याय आहे. कमी साहित्यापासून तयार केला जाणारा हा पदार्थ तुमच्या नात्यातील गोडवा आणखीनच वाढवेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया गव्हाच्या शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
गव्हाचं पीठ कणिक– १ कप
साजूक तूप – ½ कप
साखर – ¾ कप
पाणी – २ कप
वेलची पूड – ¼ टीस्पून
बदाम
काजू
मनुका
केशर – ऐच्छिकदुधात भिजवलेले काही धागे
साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार… सर्व कुटूंबियांना करेल खुश
कृती :
गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका(festival) खोलगट कढईत साजूक तूप गरम करा.
गरम तुपात गव्हाचं पीठ टाकून मध्यम आचेवर सतत हलवत छान खरपूस सुवास येईपर्यंत भाजा. पीठाचा रंग
थोडा सोनेरी झाला पाहिजे.
वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून भाजलेल्या पीठात सावधगिरीने घालावे. सावध राहा, उकळल्यामुळे उडू शकते.
पाणी मिसळल्यावर लगेच साखर टाका आणि सतत ढवळत राहा, गुठळ्या होऊ देऊ नका.
शिरा मंद आचेवर झाकण ठेवून ५-७ मिनिटं शिजवा. मिश्रण एकजीव आणि मऊसर झाले पाहिजे.
शेवटी वेलची पूड, केशर आणि भाजलेले काजू-बदाम-मनुका घाला आणि हलके ढवळा.
गॅस बंद करून गरम गरम शिरा सर्व्ह करा. रक्षाबंधनसारख्या सणाच्या दिवशी तो अधिकच स्वादिष्ट लागतो.
शिरा अजून खास बनवायचा असल्यास दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊ शकता.
ड्रायफ्रुट्स तुपात भाजूनच शिरात मिसळा.
गरमा गरम गव्हाचा शिरा चवीला छान लागतो, त्यामुळे गरम असतानाच याची चव घ्या.
हेही वाचा :
पावसाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय….
बजेट तयार ठेवा ! Diwali 2025 पूर्वीच ‘या’ 5 धमाकेदार SUVs होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
आजचा पहिला श्रावणी सोमवार राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा