भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत चांगलीच वाढ होत आहे. अनेक ग्राहक पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना(electric scooter) चांगला प्रतिसाद देत आहे. यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार ऑफर करतात. यातही सर्वात जास्त मागणी ही इलेक्ट्रिक स्कूटरला आहे. त्यामुळेच Ola Electric, TVS, आणि Bajaj सारख्या कंपन्या सुद्धा दमदार इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करताय. नुकतेच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाला आहे.

भारतीय बाजारात कायनेटिक ग्रीनने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून Kinetic DX लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स आणि रेंज प्रदान केली आहे. ज्यामुळे नक्कीच या स्कूटरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळणार.
फीचर्स
उत्पादकाने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये(electric scooter) अनेक उत्तम वैशिष्ट्ये दिली आहेत. यात 8.8 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीकर्स, व्हॉइस कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कायनेटिक असिस्ट, 748 मिमी सीट, 37 लिटर अंडरसीट स्टोरेज, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हिल होल्ड, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, इझी चार्जर, इझी की, इझी फ्लिप, 16 भाषा यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.
किती असेल रेंज?
कायनेटिक ग्रीनने लाँच केलेल्या नवीन या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.6 किलोवॅट प्रति तास एलएफपी बॅटरी आहे. जी चार तासांत 0-100 टक्के चार्ज करता येते. त्यानंतर, ती 116 किलोमीटरपर्यंत चालवता येते. त्यात बसवलेल्या हब मोटरमधून त्याला पॉवर मिळते. ही स्कूटर 90 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येते. त्यात रायडिंगसाठी तीन मोड आहेत. ज्यामुळे रायडरचा रायडींग अनुभव अधिक चांगला बनतो.
किंमत किती?
कंपनीने कायनेटिक ग्रीन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.17 लाख रुपये आहे. यासाठी ऑनलाइन बुकिंग देखील सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा :
‘अल्लाहू अकबर…विमानात बॉम्ब आहे’ प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर
मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान