बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी अचानक पोहोचले 25 IPS अधिकारी;

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता आमिर खान सध्या एका चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याच्या मुंबईमधील बांद्रा येथील घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस गाड्या या आमिर खानच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सुमारे २५ आयपीएस अधिकारी भेटीसाठी पोहोचल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सर्वत्र प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं आमिर खानच्या घरी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी का आले?

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 25 आयपीएस अधिकारी हे बॉलिवूड(Bollywood) अभिनेता आमिर खानच्या मुंबईतील बांद्रा येथील घरी पोहोचले होते. या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, ही टीम केवळ आमिर खान यांच्याशी भेटण्यासाठी आली होती. मात्र आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून या भेटीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

एका वृत्तसंस्थेने जेव्हा आमिर खानच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितले की, हे अधिकारी अचानक का आले याचं कारण समजलेलं नाही. आम्ही सध्या आमिर खानशी बोलत आहोत. त्यामुळे नेमके इतके अधिकारी आमिर खानच्या घरी का आले होते याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

आमिर खानच्या चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमिर खानचा शेवटचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ होता. ज्याने रिलीजनंतर एका महिन्यातच भारतात जवळपास 165 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केलं होतं आणि अभिनेत्री जिनिलीया डिसूजा ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला.

दरम्यान, आमिर खान लवकरच राजकुमार हिरानी दिग्दर्शित आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित बायोपिक असणार आहे. त्यामुळे आमिर खानच्या आगामी चित्रपटाबाबत आता प्रेक्षकांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता वाढली आहे. आमिर खान गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

हेही वाचा :

‘अल्लाहू अकबर…विमानात बॉम्ब आहे’ प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर

तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं, वेगवेगळ्या ठिकाणी नेत बलात्कार, ‘त्या’ 12 तासांत नक्की झालं तरी काय?

मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान