कोल्हापूरच्या नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य (pinching)मठामधून गुजरातच्या ‘वनतारा’ केंद्रात हलवण्यात आलेल्या ‘महादेवी’ हत्तीणीवर अत्याचार होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये वनतारामधील माहुत हत्तीणीला चिमटे काढून जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे.महादेवीच्या पायाला झालेली जखम आणि तिची लंगडत चाललेली हालचाल हृदयद्रावक असून, प्राणिप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वनतारामध्ये खरंच तिला अपेक्षित सन्मान, उपचार आणि स्वातंत्र्य मिळतंय का, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

२८ जुलै रोजी नांदणीहून निघालेली महादेवी ३० जुलै रोजी जामनगरच्या वनतारामध्ये पोहोचली. वनतारा प्रशासनाने तिला हायड्रोथेरपीसारख्या आधुनिक उपचारांची हमी दिली असली, तरी या प्रकारानंतर त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कठीण ठरतंय.तिच्या सुरक्षेसंदर्भात आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे रात्रीच्या वेळी प्राण्यांची वाहतूक केल्याचा संशय. कायद्यानुसार रात्री अशा प्रकारची वाहतूक गुन्हा मानली जाते.(pinching) त्यात महादेवीला ४८ तासांत एवढं लांब अंतर कसं नेलं गेलं, याचाही शोध घेणं गरजेचं ठरतंय.
नांदणीतील रहिवाशांसाठी महादेवी केवळ एक हत्तीण नव्हती, तर ती त्यांच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग होती. तिचा निरोप घेताना गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या ३६ वर्षांत ती अनेक धार्मिक विधींमध्ये सहभागी होती.मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीच्या तब्येतीसंदर्भातील चिंता व्यक्त करत तिला वनतारात हलवण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही तो आदेश कायम ठेवत या निर्णयाला ऐतिहासिक मानलं. PETA आणि FIAPO सारख्या संस्थांनीही तिच्या पूर्वस्थितीची माहिती देत तिच्या हलवाहल्याचं समर्थन केलं होतं.
मात्र सध्याच्या घडामोडी पाहता – ‘महादेवी खरंच सुरक्षित आहे का?'(pinching), ‘तिच्यावर कोणते उपचार सुरू आहेत?’ आणि ‘वनतारा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते आहे का?’ – हे सारे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.महादेवीच्या भविष्याबाबत आता संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून आवाज उठत आहे – आणि या संवेदनशील हत्तीणीसाठी खरंच न्याय मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?