सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजारांचा संबंध थेट आपल्या पोटोशी असतो.(stomach)आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला खाण्या-पिण्याकडे लक्ष देता येत नाही. खाण्याच्या अनिश्चित वेळा, सतत बाहेरचे खाणे यामुळे पोट दुखी, जुलाब असे पोटाच्या संबंधीचे आजार उद्भवतात. पण या समस्या नेहमीच जाणवत असतील तर त्यांना दुर्लक्षित करू नका. सतत पोट दुखत असल्यास हे एखाद्या गंभीर आजाराचे कारण असू शकते.

पोट दुखीची अनेक कारणे असू शकतात. तुम्हाला पोटात मरगळ, गॅस होत असेल आणि सतत शौचास जावे लागत असेल, तर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम होण्याची शक्यता आहे. तसेच आंबट ढेकर येत असतील, छातीत जळजळ हे ऍसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी या आजाराचे लक्षण आहे. सतत पोट दुखीमुळे जास्त प्रमाणात पेन किलर्स घेत असाल तर पोटाच्या आतील भागाला सुज येऊन अल्सर होऊ शकतो.

ग्लूटेनयुक्त पदार्थ जसे की गहू, राई, रवा, ओट्स, ब्रेड, पास्ता, पिज्जा, केक, सॉस, काही मसाले खाल्ल्यामुळे तुम्हाला अतिसार, थकवा आणि पोटदुखी होत असेल तर हे सेलिाआक या रोगाचे लक्षण असू शकते. (stomach)पोटातील लहान आतड्यांमध्ये संसर्ग होऊन पोटाच्या डाव्या बाजूला दुखत असेल तर तुम्हाला डायव्हर्टिकुलायटिस हा आजार होऊ शकतो. दिर्घकाळापर्यंत अतिसार आणि पोट दुखी होत असेल तर हे आतड्यांच्या आजाराचे कारण असू शकते.

शिवाय चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होत असल्यास हे पित्ताशयाच्या खड्यांचे कारण असू शकते. पाठीपासून खालच्या कंबरेपर्यंत तीव्र वेदना होत असतील तर हे किडनी स्टोनमुळे होऊ शकते. (stomach)यापासून वाचण्यासाठी जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा, धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण कमी करा, सतत पेन किलर्स घेणं टाळा. वारंवार पोट दुखत असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका… 
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?