‘ठरलं तर मग’ ही मालिका रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली हे मुख्य भूमिकेत आहेत. दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी असते.गेल्या एक महिन्यापासून ज्या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्या विलास मर्डर(Murder) केसचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. विलास मर्डर केसमध्ये साक्षी आणि तन्वी दोषी ठरल्या असून त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. अखेर दोन वर्षांनंतर मधुभाऊंना न्याय मिळाला आहे.

मालिकेतला हा महत्त्वाचा टप्पा साकारण्यासाठी ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमने कंबर कसली आहे. जवळपास महिन्याभरापासून या खास भागाची तयारी सुरु होती. मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळी या भागासाठी विशेष मेहनत घेत होते.कोर्टाचे सीन साकारण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं गेलं.
कोर्टाचं कामकाज नेमकं कसं चालतं, याची संपूर्ण माहिती आणि अभ्यास करुनच सीन लिहिले जात होते. मालिकेतले बरेचसे सीन कोर्टाचे (Murder)असल्यामुळे अभिनेता अमित भानुशाली प्रचंड मेहनत घेत होता.या अनुभवाविषयी सांगताना अमित म्हणाला, “मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवी परीक्षा असते. ‘ठरलं तर मग ‘च्या या महत्त्वाच्या सीनसाठी संपूर्ण टीमने कंबर कसली होती.”
“कोर्टातला शेवटचा सीन 50 पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त संवाद माझे होते. या सीनचं स्क्रीप्ट जेव्हा माझ्या हाती पडलं तेव्हा थोडी धाकधूक होती. मात्र मी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सीन पूर्ण केला. अभिनेता म्हणून हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही,” असं त्याने सांगितलं.केसचा निकाल लागल्यानंतर ‘ठरलं तर मग’ ही मालिका संपणार का अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय. या प्रश्नाचंही उत्तर अमितने दिलं आहे.
“मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मालिकेचा शेवट होत नाहीये. याउलट कथानक अतिशय रंजक वळण घेणार आहे. अजून बरेचसे खुलासे बाकी आहेत,” असं अमितने स्पष्ट केलंय.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष