आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.(central) रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.


गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर
गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

मध्य आणि कोकण रेल्वेने मुंबईत गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.(central) रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-एलटीटी मार्गावर आणि दिवा-खेड-दिवा मेमू मार्गावर धावतील. यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना त्यांच्या घरी जाणे आणि परतणे सोपे होईल. रेल्वेने आधीच २५० विशेष गाड्यांची घोषणा केली होती. आता मुंबई-कोकण मार्गावर एकूण २९६ गणपती विशेष गाड्या धावतील.

एसटीचे लवकरच रिटेल इंधन विक्रीत पदार्पण, परिवहनमंत्र्यांची माहिती
तिकिटे कधी बुक करायची?
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने संयुक्तपणे प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.(central) या विशेष गाड्यांचे आरक्षण ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकिटे यूटीएसवरून घेता येतील.

०११३१ विशेष ट्रेन गुरुवार आणि रविवारी सकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. परतीचा प्रवास (०११३२) सावंतवाडीहून रात्री ११.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी २८ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे.

या गाडीला थांबे

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि जराप.

दिवा-खेड-दिवा मेमू अनरिझर्व (३६ फेऱ्या)

ही दिवा येथून दुपारी १.४० वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता खेड येथे पोहोचेल. परतीचा प्रवास खेड येथून सकाळी ८ वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजता दिवा स्टेशनवर संपेल. ही गाडी २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दररोज धावणार आहे.

तसेच मध्य रेल्वेने २५० गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. यासोबतच पश्चिम रेल्वेने ४४ विशेष गाड्या चालवण्याची घोषणाही केली आहे. याचा फायदा मुंबई आणि विरार दरम्यान राहणाऱ्या कोकणी लोकांना होईल.

– ट्रेन क्रमांक ०११५१/२ सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडीला दुपारी २.२० वाजता पोहोचेल. या ट्रेनच्या ४० फेऱ्या असतील.

– ट्रेन क्रमांक ०११०३/४ सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ति

– ट्रेन क्रमांक ०११५३/४ सीएसएमटी- रत्नागिरी-सीएसएमटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि रात्री ८.१० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११६७/८ एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन एलटीटीहून रात्री ९ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तिच्या ३६ फेऱ्या देखील असतील.

– ट्रेन क्रमांक ०११७१/२ एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून निघेल आणि रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११२९/३० एलटीटी- सावंतवाडी रोड-एलटीटी (दर मंगळवारी): ही ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी धावेल. ही ट्रेन सकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून निघेल आणि रात्री १०.२० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११८५/६ एलटीटी- मडगाव-एलटीटी (दर बुधवारी): ही ट्रेन २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी धावेल. ही एलटीटीहून दुपारी १२.२० वाजता निघेल आणि मडगावला दुपारी २.३० वाजता पोहोचेल.

– ट्रेन क्रमांक ०११६५/६ एलटीटी- मडगाव-एलटीटी (एसी): ही ट्रेन २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी धावेल. ही एलटीटीहून दुपारी १२.४५ वाजता निघेल.

पश्चिम रेल्वे ४४ गणपती विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेने ४४ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा देखील केली आहे. या गाड्या चर्चगेट आणि विरार दरम्यान धावतील. या गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होईल.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष