सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार; अनेक गुन्हे दाखल होताच अखेर पोलिसांनी…

टीकेश फुंडे याच्याविरोधात अवैध रेती चोरी आणि अवैध वाहतुकीचे तसेच(booked) शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जप्त वाहन पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहेत.

गोंदिया : रेती चोरी आणि इतर गुन्ह्यांमध्ये वारंवार कारवाई करूनही सुधारणा होत(booked) नसल्यामुळे अखेर 2 गुन्हेगारांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्द‌पार करण्यात आले. टीकेश उर्फ गोलू अशोक फुंडे (वय 29, रा. परसोडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. टीकेश हा रेतीचोरीचा सराईत गुन्हेगार आहे.

टीकेश फुंडे याच्याविरोधात अवैध रेती चोरी आणि अवैध वाहतुकीचे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जप्त वाहन पळवून नेणे आदी गुन्हे दाखल आहेत.(booked) त्याच्या या कृत्याला आळा घालण्यासाठी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगाव यांच्याकडे सादर केला होता. उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी त्याला एक वर्षासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून तडीपार केले.

तसेच वसंतराव रामलाल पटले (वय 34, रा. पांढरी) हा क्षुल्लक भांडणावरून गंभीर दुखापत करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्यावर डुग्गीपार पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शिक्षाही झाली. असे कृत्य पुन्हा करू नये. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी अर्जुनी मोरगाव येथे सादर केला होता. त्यालाही वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले.

हेदेखील वाचा : नाईट लाईफ, पब अन् हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांची जोरदार कारवाई; चार वर्षात 705 ड्रग्ज पेडलर जेरबंद

दरम्यान, ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गणेश वनारे, पोलिस हवालदार जगदीश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, राकेश राऊत, प्रल्हाद खोटेले, पोलिस नायक अमिद नेवारे, महेंद्र सोनवाणे, शिपाई रंजित भांडारकर, उदेभान रूखमोडे यांनी केली.

नाईट लाईफवर पुणे पोलिसांची जोरदार कारवाई

सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वास्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष