शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही अशाप्रकारे चेक करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बनारस येथून पीएम किसान(Farmer)सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जारी केला. यामधून ९.७ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात ₹2000 ची रक्कम DBT द्वारे पाठवण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान(Farmer) सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना ₹6000 ची मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आजचा २० वा हप्ता जाहीर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी लगेच आपल्या खात्याचा स्टेटस चेक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ वर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून ‘Get Data’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचं नाव, हप्ता प्राप्त झाला की नाही, त्याची तारीख यासारखी माहिती दिसून येईल. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे तपासा. कारण, सरकारने e-KYC अनिवार्य केली आहे, आणि त्याशिवाय हप्ता मिळणार नाही.

कोण पात्र आणि अर्ज कसा करायचा? :
या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिक आणि लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांनाच (Farmer)मिळतो. अर्जदाराने आयकर भरलेला नसावा, आणि ₹10,000 पेक्षा अधिक पेन्शन मिळत नसावी, हेही महत्त्वाचे निकष आहेत.


अर्ज करण्यासाठी प्रक्रिया:

– https://pmkisan.gov.in वर जा

– “New Farmer Registration” वर क्लिक करा

– आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा

– तपशील भरून YES वर क्लिक करा

– संपूर्ण फॉर्म भरून सबमिट करा

तक्रारीसाठी मदत मिळवण्यासाठी :

कोणतीही तांत्रिक अडचण, तक्रार किंवा मार्गदर्शन आवश्यक असल्यास PM किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 किंवा 011-24300606 वर संपर्क साधता येतो. शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईट आणि कॉल सेंटरचा वापर करून योग्य माहिती घ्यावी.
हे स्पष्ट आहे की, पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी रक्षाबंधनपूर्वीचा आर्थिक

हेही वाचा :

सर्किट बेंचमुळे कोल्हापूर आले विकासाच्या महामार्गावर
दररोज दही खाणे आरोग्यावर परिणाम करू शकतात का? ‘ही’ 5 तथ्ये तुमचा संभ्रम करतील दूर
पावसाळ्यात फ्रिजची काळजी कशी घ्यावी ? जाणून घ्या उपयुक्त मार्ग