श्रावण महिना भगवान शंकराचा(time) प्रिय काळ आहे.

श्रावणातील सोमवारी विशेष उपाय करणे शुभ मानले जाते.
घरगुती वाद दूर करण्यासाठी शिवपूजा करावी.
भगवान शंकराचा प्रिय महिना श्रावण सध्या सुरू आहे. श्रावणातील सोमवार हा अत्यंत खास मानला जातो. आजही श्रावणातला सोमवर असून जर या दिवशी रात्री काही खास उपाय केले गेले, (time)तर महादेवाची कृपा सहज मिळू शकते. चला जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी रात्री कोणते उपाय केल्यास शुभ फळ मिळू शकतात.

घरगुती कलह दूर करण्यासाठी उपाय
श्रावणातील सोमवारी घरातील वाद-विवाद, तणाव किंवा अशांततेपासून मुक्ती हवी असेल तर रात्रीच्या वेळी जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शंकराची मनापासून पूजा करा.(time) शिवलिंगासमोर तूपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर त्याच ठिकाणी शांत बसून शिव चालीसा म्हणावी.
ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यनुसार, यावेळी आपल्या चुका लक्षात घेऊन मनातल्या मनात क्षमा मागा आणि आपल्या मनोकामना तीन वेळा महादेवासमोर व्यक्त करा. या उपायामुळे घरातील वाद मिटण्यास मदत होते आणि शांतीचं वातावरण निर्माण होतं.
आजारपण टाळण्यासाठी उपाय
जर शरीर किंवा मनाशी संबंधित आजार सतावत असतील तर श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी रात्री भगवान शंकराची उपासना अवश्य करावी. मनापासून आणि श्रद्धेने महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जपावा. या उपायामुळे शारीरिक त्रास कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.

करिअर आणि यशासाठी उपाय
ज्यांना करिअरमध्ये अडथळे येत असतील किंवा यश काही मिळत नसेल त्यांनी देखील श्रावणातील सोमवारी रात्री हा उपाय करावा. श्री गणेश, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची विधिपूर्वक पूजा करावी. शिवलिंगासमोर तूपाचा दिवा लावून शिव चालीसा म्हणावी. पूजा करताना आपल्या सर्व मनोकामना स्पष्टपणे महादेवासमोर बोलाव्यात. या उपायामुळे ग्रहदशा सुधारते, यशाच्या संधी वाढतात आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.
श्रावण महिन्यातील सोमवार का महत्त्वाचा मानला जातो?
श्रावण हा भगवान शंकराचा प्रिय महिना असून, सोमवारी त्यांची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतो.
घरातील तणाव आणि वाद कमी करण्यासाठी कोणता उपाय सांगितला आहे?
श्रावणातील सोमवारी रात्री शिवमंदिरात तूपाचा दिवा लावून शिवचालीसा म्हणावी आणि मनोकामना व्यक्त कराव्यात.
आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणता मंत्र जपावा?
श्रावण महिन्याच्या अखेरच्या सोमवारी रात्री महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा.
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कोणती पूजा करावी?
श्री गणेश, भगवान शिव आणि देवी पार्वती यांची विधिपूर्वक पूजा करून शिवचालीसा म्हणावी.
शिवपूजेदरम्यान मनोकामना कशी व्यक्त करावी?
पूजेदरम्यान श्रद्धेने आणि स्पष्टपणे आपल्या मनोकामना महादेवासमोर तीन वेळा बोलून व्यक्त कराव्यात.
हेही वाचा :
सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS अधिकारी; एकदा नाही तर दोनदा केली UPSC क्रॅक; अपराजिता राय यांचा प्रेरणादायी प्रवास
मुंबई-नांदेड वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर
सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरुच! काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या