तुम्हीही स्मार्टफोनचा अतिवापर करता का? जाणून घ्या ‘हे’ गंभीर परिणाम आणि उपाय!

सतत फोनवर ऍक्टिव्ह राहिल्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. झोपेच्या समस्या, शारीरिक आणि मानसिक समस्या, नातेसंबांधांमध्ये वादविवाद अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते.स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे झोप, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर (Serious)परिणाम होतो.तरुणांमध्ये स्मार्टफोनचा अतिरेक वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करतो.

ही समस्या इतकी गंभीर(Serious) झाली आहे की तिला सार्वजनिक आरोग्य महामारी मानले जात आहे. स्मार्टफोनची सवय आज आधुनिक जीवनशैलीसाठी एक मोठा धोका ठरली आहे. स्मार्टफोनने आपली काम करण्याची, आराम करण्याची आणि समाजाशी जोडण्याची पद्धत बदलली आहे. पण सतत फोनवर अॅक्टिव राहण्यामुळे त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

फोनच्या भरपूर वाढलेल्या उपयोगामुळे झोप, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि वैयक्तिक नातेसंबंधांवरही वाईट परिणाम होतो, विशेषतः तरुण व युवावर्गामध्ये. या समस्येला सार्वजनिक आरोग्य महामारी मानले जाते.स्पेनने यावर एक महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. स्पेनमध्ये सर्व स्मार्टफोनवर सिगारेट पॅकेटांवर असलेल्या आरोग्य सुचानांसारखी सूचना लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याचा उद्देश अत्याआधिक स्क्रीन टाईममुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्येबाबत जागरूकता वाढवणे आणि फोनच्या विचारपूर्वक वापरासाठी लोकांना प्रेरित करणे हा आहे.

लोक जास्तीत जास्त वेळ फोनवर घालवतात, त्यांना हृदय विकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, ब्लड प्रेशर, वजन वाढणे, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या सगळ्या संशयनमध्ये मात्र हृदय विकाराच्या झटक्याचा धोका हा जास्त प्रमाणात असतो. हे संशोधन १९९० ते १९९१ मध्ये जन्मलेल्या जवळपास १४,५०० लोकांवर करण्यात आले आहे.ज्यांची शारीरिक हालचाल कमी असते आणि जास्त वेळ स्मार्टफोन वापरतात, त्यांना हृदय विकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक धोका मोठ्या प्रमाणावर असू शकतो.

रिसर्चनुसार, जे स्मार्टफोनवर जास्त वेळ आहेत, त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. त्यातून त्यांच्यामध्ये लठ्ठपणा , टाइप-2 डायबिटीज आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.कमी शारीरिक हालचालींमुळे न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजार विकसित होण्याचा धोका असू शकतो.स्मार्टफोनच्या अतिवापराच्या या परिणामांवर नियंत्रण ठेवणं आणि वेळेवरच फक्त त्याचा उपयोग करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे, स्मार्टफोनच्या वापराबद्दल जागरूकता असणे आणि जीवनशैलीत बदल करणे अतिशय आवश्यक आहे

स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, टाइप-2 डायबिटीज, पाठीच्या मणक्याशी संबंधित समस्या, डोळ्यांचे आजार अशा अनेक आजारांचा धोका वाढतो.सतत स्क्रीनवर राहिल्यामुळे तणाव, चिंता, झोपेचा अभाव, आत्मविश्वास कमी होणे आणि सामाजिक अलगाव यासारखे मानसिक त्रास वाढतात.

तरुणांमध्ये स्मार्टफोनच्या अतीवापरामुळे शारीरिक हालचाल कमी होते, त्यातून लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन, झोपेच्या समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. दीर्घकालीन परिणाम गंभीर स्वरूपाचे असू शकतात.स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा, झोपेच्या एक तास आधी फोन न वापरणे, सततच्या नोटिफिकेशन्स बंद करणे, फोनऐवजी शारीरिक किंवा सामाजिक क्रियाकलाप निवडणे, डिजिटल डिटॉक्सचे नियोजन करणे.

हेही वाचा :

70 वर्षांनंतर हॅरी ब्रूकने केला हा मोठा पराक्रम, असे करणारा तो तिसरा फलंदाज
लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश
सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट फ्लॉप; केदार शिंदे म्हणाले, “माझ्याच विचारातच खोट… प्रेक्षकांना सूरज अभिनेता म्हणून नकोच असेल”