‘तो’ एकुलताएक सुपरस्टार, ज्यानं सिल्वर स्क्रिनवर तीन सख्ख्या बहिणींसोबत केला रोमान्स; तिघींसोबतच्या फिल्म्स सुपरहिट

बॉलिवूडमधली अनेक दिग्गज कुटुंब सध्या इंडस्ट्रीवर राज्य करतायत. त्या कपूर कुटुंब, बच्चन, खान, पांडे यांसारख्या काही कुटुंबांचा समावेश होतो. एकाच जनरेशनची सख्खी-चुलत भावंडही सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत. पण, आज आम्ही अशा एका सुपरस्टारबाबत सांगणार आहोत, ज्यानं एकाच कुटुंबातील तब्बल तीन अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. एकाच कुटुंबातल्या सख्ख्या बहिणी त्याकाळी इंडस्ट्रीवर राज्य करत होत्या. त्याचवेळी या सुपरस्टारच्याही (Superstar)जोरदार चर्चा होत्या. त्यावेळी या सिनेस्टारनं तिन्ही सुपरस्टार बहिणींसोबत सिल्वर स्क्रिन शेअर केली.

ज्या बहि‍णींबाबत आम्ही सांगतोय, त्या म्हणजे, साऊथच्या सौंदर्यवती नगमा, तिची बहिण ज्योतिका आणि रोशनी. या तिघींच्या सौंदर्यानं एकेकाळी साऊथ इंडस्ट्री गाजली होती. विशेषतः नगमानं तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस केलं. नगमाने अनेक साऊथ सुपरस्टार्ससोबत काम केलं. नंतर तिनं चित्रपटसृष्टीपासून स्वतःला दूर केलं. तिनं लग्न केलं नाही, तर स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दूर केलं.

नगमाची बहीण ज्योतिका हिनं तिच्या निवडक पात्रांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. तिनं तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसेच, आजवर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तर, तिसरी बहीण रोशनी हिनंही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? तिन्ही बहिणींसोबत काम करणारा एकमेव स्टार अजूनही चित्रपटांमध्ये फक्त हिरोची भूमिका करतो. एवढंच काय तर, अजूनही त्याची गणना इंडस्ट्रीच्या सुपरर्स्टार्समध्ये (Superstar)केली जाते. या हिरोनं तिन्ही बहिणींसोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये रोमान्स केला आहे.

सख्ख्या बहिणी असलेल्या तीन अभिनेत्रींसोबत काम करणारा स्टार दुसरा तिसरा कोणी नसून ‘मेगास्टार चिरंजीवी’आहे. चिरंजीवीनं या तिन्ही बहिणींसोबत काम केलं आहे आणि त्याचे चित्रपट टॉलीवूडमध्ये सुपरहिट ठरले आहेत. चिरंजीवीनं नगमासोबत ‘गरणा मोगुडू’, ‘रिक्शावडू’, ‘मुव्वा गावकल्लू’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं ज्योतिकासोबत ‘थागोर’ चित्रपटात काम केलं आहे. चिरंजीवी रोशनीसोबत ‘मास्टर’ चित्रपटात दिसला होता. अशाप्रकारे, चिरंजीवीनं तिन्ही बहिणींसोबत काम केलंय.

दरम्यान, ‘मेगास्टार चिरंजीवी’ चिरंजीवीबाबत बोलायचं झालं तर, कधीकाळी सुपरहिट सिनेमे देणाऱ्या या सुपरस्टारचे दरम्यानच्या काळात आलेले काही सिनेमे मात्र फ्लॉप ठरले. सध्या तो ‘विश्वंभरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वसिष्ठ यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं
‘मला बेशुद्ध करुन…’, अभिनेत्रीच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापासून वाचलं, कर्जाचा डोंगर झाल्याने रस्त्यावर काढली रात्र
महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर