वयाच्या १७ व्या वर्षी केले बॉलीवूडमध्ये पदार्पण; हिट चित्रपट देऊन झाली चाहत्यांच्या मनातली राणी

अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणा आणि हसण्याच्या (actress)सवयीसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री काजोल तिचा आज ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिच्या प्रवासाबद्दल आणि चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.

काजोलचा ५१ वा वाढदिवस
काजोलचे वयाच्या १७ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण
काजोलच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट
जेव्हा आपण बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींबद्दल बोलतो तेव्हा(actress) काजोलचे नाव नक्कीच घेतले जाते. ६ फिल्मफेअर पुरस्कारांसह ४० हून अधिक वेगवेगळे पुरस्कार जिंकणारी काजोल तीन दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. एका फिल्मी कुटुंबातून आलेली काजोलने वयाच्या १७ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या कारकिर्दीत, काजोलने रोमँटिक भूमिका, नकारात्मक भूमिका आणि आईची भूमिका देखील साकारली आहे.

काजोलने तिची मावशी नूतनसोबत सर्वाधिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे. काजोल अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि मुख्य भूमिकांमध्ये चित्रपट करत आहे. आज काजोल तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिच्या कारकिर्दीबद्दल, प्रमुख भूमिकांबद्दल आणि तिच्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

काजोल एका फिल्मी कुटुंबातून येते
काजोलचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत झाला. काजोल एका मोठ्या फिल्मी कुटुंबातून आलेली अभिनेत्री आहे. ती ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक-निर्माता शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे. दिग्गज अभिनेत्री नूतन ही तिची मावशी आहे. तिची आजी शोभना समर्थ आणि आजी रतनबाई देखील फिल्मी (actress)जगातून आल्या होत्या. तिचे काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी चित्रपट अभिनेते होते. तिचे आजोबा शशधर मुखर्जी आणि आजोबा कुमारसेन समर्थ चित्रपट निर्माते होते. तर अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता मोहनीश बहल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी हे काजोलचे चुलत भाऊ आहेत. काजोलने १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केले. आणि तिच्या आयुष्य आणखी सुंदर बनले.

वयाच्या १७ व्या वर्षी पदार्पण
काजोलने १९९२ मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. काजोल तिच्या पहिल्या चित्रपटादरम्यान शाळेत होती. तिच्या कारकिर्दीचा दुसरा चित्रपट शाहरुख खानचा ‘बाजीगर’ होता. ‘बाजीगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. ‘बाजीगर’ चित्रपट आणि यामधील गाणी प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर अभिनेत्रीने ‘उधार की जिंदगी’, ‘ये दिल्लगी’, ‘हलचुल’ आणि ‘गुंडाराज’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांची पसंती बनली.

१९९५ हे वर्ष काजोलच्या कारकिर्दीसाठी खास ठरला
१९९५ हे वर्ष काजोलच्या कारकिर्दीसाठी खूप खास होते, कारण या वर्षी काजोलला तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि संस्मरणीय चित्रपट मिळाला. याच वर्षी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ त्या वर्षातीलच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्याच वर्षी सलमान खान आणि शाहरुख खानचा ‘करण अर्जुन’ हा चित्रपटही काजोलच्या खात्यात हिट ठरला.

सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी एकमेव अभिनेत्री
यानंतर, १९९७ मध्ये, काजोलने रोमँटिक नायिकेपासून वेड्या प्रेमीच्या नकारात्मक भूमिकेत बदल केला आणि ‘गुप्त’ चित्रपटामध्ये दिसली. या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या श्रेणीत पुरस्कार जिंकणारी ती पहिली आणि एकमेव अभिनेत्री ठरली. त्याच वर्षी, काजोलने आमिर खान आणि अजय देवगण अभिनीत ‘इश्क’ मध्ये जुही चावलासोबत काम केले. आणि हा चित्रपट देखील हिट झाला.

१९९८ मध्ये सलग दोन हिट चित्रपट
१९९८ हे वर्ष काजोलच्या कारकिर्दीसाठी खूप यशस्वी ठरले. या वर्षी काजोलने अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दुश्मन’ यांचा समावेश आहे. ‘कुछ कुछ होता है’ साठी, काजोलला तिचा दुसरा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

अजय देवगणसोबत लग्नानंतर दिले हिट चित्रपट
काजोलने १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणशी लग्न केले. लग्नानंतर काजोलचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट अजय देवगणसोबतचा ‘दिल क्या करे’ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर काजोलचे आणखी काही चित्रपटही फ्लॉप झाले. लग्नानंतर काजोलला २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या रूपात तिचा पहिला हिट चित्रपट मिळाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.

हेही वाचा :

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना दोन कोटींचा भुर्दंड, काहींची मुजोरी सुरूच…
प्रसिद्ध अभिनेत्याचा कारमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण…
प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश