महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली (salary) असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरची अंतिम तारीख देण्यात आली आहे. निवडणूक 15 तारखेला असून निकाल 16 जानेवारीला लागणार आहे. या निकालाबरोबरच महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांना प्रशासक म्हणजेच नगरसेवक मिळणार आहेत. मात्र नगरसेवक झाल्यावर प्रत्येकाला किती मानधन मिळतं माहितीये का? आलिशान गाड्या, घरं असलेले अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. मात्र या नगरसेवकांना किती मानधन मिळतं हे वाचून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. नगरसेवकांना मिळणाऱ्या याच मानधनाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात 29 महापालिकांची एकत्र होत असली तर सर्वच महापालिकेच्या नगरसेवकांना एकसमान पगार मिळत नाही. नगरसेवक म्हणून कोणत्या महापालिकेतून उमेदवार निवडून आला आहे यावर पगार ठरवला जातो. मुळात या पालिकांचं वर्गीकरण कसं होतं? कोणत्या पालिका कोणत्या प्रकारात मोडतात आणि त्या पालिकेतील नगरसेवकांना किती पगार दिला जातो, यासंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात…

सर्वात पहिली बाब म्हणजे महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये निवडून (salary)जाणाऱ्या नगरसेवकांना पगार नव्हे, तर मासिक मानधन दिले जाते. आता पगार आणि मानधनामध्ये फरक काय असं विचारलं तर पगार हा ठराविक काळानंतर मिळतोच मिळतो. म्हणजेच एकाद्या व्यक्तीने ठराविक कामासाठी नेमून दिलेल्या व्यक्तीला कामाच्या मोबदल्यात जी रक्कम मिळते त्याला पगार म्हणतात. तर मानधन म्हणजे एखाद्या कामासाठी एखाद्या व्यक्तीने त्याची कौशल्य वापरुन ते काम पूर्ण केलं तर सन्मार्थ त्याला जी रक्कम दिली जाते त्याला मानधन म्हणतात.आता तुम्हाला वाटत असेल की सर्व महानगरपालिकांच्या नगरसेवकांना समान मानधन मिळतं, तर तुम्ही चुकत आहात. महापालिकेच्या नगरसेवकांना दिलं जाणारं मानधन हे. त्या त्या महापालिकेच्या श्रेणीनुसार ठरते. यामध्ये अ+, अ, ब, क, ड यासारख्या श्रेणी आहेत. ही वर्गवारी त्यात त्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात असलेली लोकसंख्या, उत्पन्न आणि इतर निकषांवर आधारित आहे. नगरसेवकांना सर्वाधिक मानधन देणारी महानगरपालिका म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका ही अ+ श्रेणीत येते. मुंबई महानगरपालिकेचं मानधन हे महाराष्ट्रात कोणत्याही नगरसेवकांना दिलं जाणारं सर्वाधिक मानधन आहे.

सर्वाधिक मानधन असणारी पालिका कोणती? या पालिकेतील (salary)नगरसेवकांनी किती मानधन मिळतं?मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांना दर महिना 25 हजार रुपये मानधन मिळते. हे मानधन 2017 च्या शासकीय निर्णयानुसार निश्चित करण्यात आलं असून अ श्रेणीतील महानगरपालिकांच्या नगरसेवकांना 20 हजार रुपय प्रति महिना मानधन दिलं जातं. या श्रेणीमध्ये पुणे आणि नागपूर महापालिकेचा समावेश होतो.तर ब श्रेणीमध्ये ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिकांचा समावेश होतो.येथील नगरसेवकांना दर महिना 15 हजार रुपये मानधन दिलं जातं. क किंवा ड श्रेणीमधील महापालिकांमधील नगरसेवकांना प्रति महिना मिळणारं मानधन हे अवघे 10 हजार प्रति महिना इतकं आहे.या मुख्य मानधनाबरोबरच नगरसेवकांना बैठक भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सुविधा ज्यामध्ये फोनचं बिल, वाहन भत्ता मिळतो. नगरसेवकांना विकास निधी हा मानधन आणि भत्य्याहून वेगळा मिळतो. या निधीमधून नगरसेवकाला आपआपल्या प्रभागातील छोटी कामे करता येतात.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!