१२ ऑगस्ट २०२५ रोजी ट्रम्पचा मृत्यू होणार ? द सिम्पसन्सची भविष्यवाणी !

जगभर प्रसिद्ध असलेला अमेरिकन अ‍ॅनिमेटेड टीव्ही शो The Simpsons पुन्हा (Simpsons)एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी कारण आहे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत कथित ‘भविष्यवाणी’. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात असे दाखवले गेले आहे की ट्रम्प यांना रुग्णालयात नेले जाते आणि तिथेच त्यांचा मृत्यू होतो. विशेष बाब म्हणजे व्हिडिओमध्ये ही घटना १२ ऑगस्ट २०२५ रोजी घडते, असेही स्पष्ट दाखवले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली असून, The Simpsons पुन्हा एकदा ‘भविष्यवाणी करणारा शो’ म्हणून चर्चेत आला आहे. (Simpsons)यापूर्वीही या शोने अनेक घडामोडींचे अचूक भाकीत केल्याचे उदाहरण म्हणून ट्रम्प यांची राष्ट्रपती निवड, डिज्नीची फॉक्स खरेदी, स्मार्टवॉचचा वापर, आणि 9/11 संदर्भित दृश्य यांचा उल्लेख केला जातो.

तथापि, अनेक नेटिझन्स व तथ्य तपासणाऱ्या संस्था या व्हिडिओची सत्यता तपासत असून, तो बनावट AI किंवा संपादित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. The Simpsons शोच्या कोणत्याही अधिकृत एपिसोडमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची अशी थेट दृश्ये दाखवली गेली असल्याचा स्पष्ट पुरावा अद्याप उपलब्ध नाही.

The Simpsons निर्माते आणि प्रसारण करणारे फॉक्स नेटवर्क यांच्याकडून अद्याप या व्हिडिओवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.(Simpsons) मात्र, काही चाहत्यांनी या क्लिपला ‘फॅन मेड’ प्रशंसकांनी तयार केलेलाअसल्याचा दावा केला आहे.सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण हे The Simpsons चं आणखी एक अचूक भाकीत असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण अशा प्रकारच्या व्हिडिओंच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत आहेत.

हेही वाचा :

सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?