“पंतला एकटे सोडा” – सचिन तेंडुलकरचे ऋषभबाबत खास विधान

इंग्लंडविरुद्ध झालेल्या ऋषभच्या दुखापतीबद्दल भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने ऋषभ पंतबद्दल मोठे विधान केले आहे. ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार प्रदर्शन(Exhibition) केले. दुखापतग्रस्थ अवस्थेतही तो मैदानात खेळायला आला यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु झाली. भारतीय संघाचा माजी दिग्गज आणि ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर यांनी ऋषभ पंतबद्दल मोठे विधान केले आहे. इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळताना पंतला झालेल्या दुखापतीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

टेस्ट मालिकेत पंतने अफाट कामगिरी केली. चौथ्या टेस्टदरम्यान दुखापत झाल्यानंतरही त्याने शानदार अर्धशतक ठोकत संघाला आधार दिला. या जिद्दीला सर्वत्र सलाम करण्यात आला. आता सचिन तेंडुलकर यांनी पंतच्या खेळाबाबत कौतुक करत स्पष्ट शब्दांत सांगितले – “त्याला पूर्णपणे मोकळे सोडा.”रेडिटवरील चर्चेत सचिन म्हणाले, “माझ्या मते ऋषभ पंतला आपल्याच पद्धतीने खेळू द्यायला हवे. त्याच्याकडे स्वतःचा गेम प्लॅन आहे आणि तो ते प्रभावीपणे राबवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो जखमी असतानाही संघासोबत राहिला, हे पाहून मला खूप आनंद झाला.”

या संपूर्ण टेस्ट मालिकेत पंतने 4 सामन्यांत 68.43 च्या सरासरीने 479 धावा केल्या. त्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके समाविष्ट होती. पहिल्या टेस्टच्या दोन्ही डावांत त्याने शतक झळकावून इंग्लंडला हादरा दिला होता. मालिका अखेरीस 2-2 अशा बरोबरीत संपली(Exhibition). पहिला सामना इंग्लंडने जिंकला, दुसरा भारताने आपल्या नावावर केला, तिसऱ्या सामन्यात पुन्हा इंग्लंडने विजय मिळवला तर चौथा सामना ड्रॉ झाला. निर्णायक पाचव्या सामन्यात भारताने बाजी मारली.

या संपूर्ण टेस्ट मालिकेत पंतने 4 सामन्यांत 68.43 च्या सरासरीने 479 धावा केल्या. त्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके समाविष्ट होती. पहिल्या टेस्टच्या दोन्ही डावांत त्याने शतक झळकावून इंग्लंडला हादरा दिला होता. मालिका अखेरीस 2-2 अशा बरोबरीत संपली. पहिला सामना इंग्लंडने जिंकला, दुसरा भारताने आपल्या नावावर केला, तिसऱ्या सामन्यात पुन्हा इंग्लंडने विजय मिळवला तर चौथा सामना ड्रॉ झाला. निर्णायक पाचव्या सामन्यात भारताने बाजी मारली.

हेही वाचा :

रक्षाबंधनावर अंकिताचे दादासाठी खास गिफ्ट आणि भावूक पत्र
आशिया कप 2025: भारत-पाकिस्तान तिनदा भिडणार? हे आहे पूर्ण गणित
रेल्वे प्रवास होणार स्वस्त, राउंड ट्रिप तिकिटांवर मोठी सूट