इबोला विषाणूचे भय वाढले?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

सध्याचे दशक खरोखरच आपत्तीजनक, आपत्तीचे आहे. अचानकपणे आलेल्या संकटाचे आपण”आधीच दुष्काळाचा महिना, त्यात अधिकमास“असे उद्वेगजनक वर्णन करतो. भारतासह पश्चिम आशियाई देश टंचाईग्रस्त परिस्थितीला सामोरे जात असतानाच इबोला या जीवघेण्या विषाणुने डोके वर काढले आहे.हा संसर्गजन्य विषाणू भारताच्या दरवाज्यावर टकटक करतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात संपूर्ण जगाला सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे.काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भारतासाठी आणि जगासाठी चालू दशक हे आपत्तीजनक असल्याचे सांगितले होते. इसवी सन 2019 मध्ये कोविड विषाणू ने भारतासह जगभर थैमान घातले होते. लक्षावधी लोकांना गिळंकृत केले होते.

बहुतांशी देशांचे अर्थकारण डळमळीत केले होते. अनेक बलाढ्य देशांचा जीडीपी घसरला होता. तब्बल तीन वर्षे या कोविडने जगाला वेठीस धरले होते.कोविड चा विळखा सैल झाल्यानंतर अनेक देश युद्धग्रस्त बनले. अगदी सुरुवातीला हमास या दहशतवादी संघटनेने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना इजराइलवर एकाच वेळी शेकडो ड्रोन सोडून हल्ला केला. आणि मग इसराइल विरुद्ध गाझापट्टी, इजराइल विरुद्ध लेबनॉन, (Ebola)तसेच रशिया आणि युक्रेन याच दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान, आम्ही गेल्या दोन अडीच महिन्यापासून इजराइल अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष सुरू झाला. याच दरम्यान पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातही युद्ध सुरू झाले आहे. या युद्धांचे प्रतिकूल दुष्परिणाम पश्चिम आशियाई देशांवर होणे स्वाभाविक होते आणि तसे ते झालेही आहेत.

भारतात सह काही देश टंचाईग्रस्त बनले आहेत. तेथील जनतेला महागाईच्या झळा बसत आहेत.हे असे युद्धग्रस्त हातावरण असताना आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला हा जीवघेणा विषाणू तयार झाला आहे. या विषाणू ने अनेक जणांचे बळीही घेतले आहेत. आता या संसर्गजन्य विषाणूची जगावर टांगती तलवार आहे. केनिया, युगांडा, तांझानिया, दक्षिण येमेन, सुदाम, सोमालिया या देशांमध्ये इबोला या भयंकर विषाणू ने आपले हात पाय पसरलेले आहेत. आफ्रिकन देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर केंद्रीय आरोग्य यंत्रणेने लक्ष ठेवले आहे.(Ebola) तेथून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य विषयक तपासणी करूनच त्याला त्याच्या घरी जाऊ देण्यात येणार आहे. इबोलाची लक्षणे आढळून आली तर त्याला क्वारंटाईन केले जाणार आहे. इबोला संसर्ग झालेल्यांसाठी रुग्णालयात स्वतंत्र विभाग उघडण्यास सर्व जिल्हा आरोग्य यंत्रणांना सांगितलेले आहे.डोकेदुखी, थकवा येणे, स्नायू आणि सांधे दुखी वाढणे, घसा खवखवणे, उलट्या आणि जुलाब होणे,त्वचेवर पुरळ उठणे, हिरड्यातून आणि नाकातून रक्तस्त्राव होणे, ताप येणे, अशी लक्षणे दिसूलागल्यानंतर संबंधितांनी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही लक्षणे इतर आजारासाठी असली तरी ईबोला हा विषाणू शरीरात गेल्यानंतर ही सर्व लक्षणे आठ ते दहा दिवसात मोठ्या प्रमाणात दिसू लागतात.

कोविड काळात जागतिक आरोग्य संघटनेने तसेच भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वसामान्य जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. अगदी सुरुवातीला कोविडला फारसे गांभीर्याने घेतले गेले नव्हते. (Ebola) नंतर मात्र लॉकडाऊन करण्यापर्यंत कठोर उपाय योजना कराव्या लागल्या. त्यामुळे इबोलाचे संकट दारापर्यंत आलेले नाही म्हणून बेसावध राहणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते.भारतामध्ये जगभरातून लोक येत असतात. आफ्रिकन देशामधूनही ते कोणत्या ना कोणत्या कामासाठी म्हणून येत असतात. त्यामुळे विमानतळावरच येणाऱ्या प्रवाशाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कोविड काळातील कोरोना चा अनुभव असल्यामुळे इबोला चा प्रतिकार करण्यासाठी कठोर उपाय योजना केल्या जातील. एकदा दुधाने तोंड भाजले आहे त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावे लागणार आहे.

हेही वाचा :

बेटिंगसाठी साडेसहा कोटींना वेबसाईट?

गोकुळ निवडणुकीसाठी 2 हजार ठराव गोळा करा

1948 ते 2026… अशी बदलत गेली एसटी!