अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रामुळे शिरोळ तालुक्यातील बेकरी, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. अकिवाट, अब्दुललाट तसेच यड्राव येथील शालिमार कंपनीवर नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर अनेक लघुउद्योगांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले उद्योग तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.एफडीएकडून कोणतीही पूर्वसूचना न देता (Food and Drug) अचानक तपासण्या सुरू करण्यात आल्याने उत्पादन क्षेत्रात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बेकरी आणि नमकीन उत्पादकांमध्ये कारवाईची धास्ती वाढल्याचे चित्र दिसत आहे.

अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या उद्योजकांनाही तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी उत्पादन थांबविणेच पसंत केले आहे.काही व्यावसायिकांच्या मते, नियमांचे पालन करूनही अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू नये, या भीतीपोटी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील लघुउद्योग क्षेत्रात संभ्रम आणि चिंता वाढली आहे.(Food and Drug) दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. तालुक्यातील विविध उत्पादन युनिट्सची तपासणी करून परवाने, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता आणि दर्जासंदर्भातील निकषांची पडताळणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रात सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून एफडीएच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यड्राव येथील शालिमार कंपनीवरील कारवाईनंतर शिरोळ तालुक्यातील बेकरी, नमकीन व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Food and Drug) अचानक धाडी आणि गुप्त तपासण्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून उद्योग तात्पुरते बंद ठेवले आहेत. नियमांचे पालन करणाऱ्या उद्योजकांनाही कारवाईची भीती वाटत असल्याने उद्योग क्षेत्रातून प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन आणि पारदर्शक तपासणी प्रक्रियेची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :
मोदी आणि अभिजित दीपकेची अमेरिकेत भेट? व्हायरल फोटोने खळबळ