खासदार शरद पवार यांची प्रकृती (health) बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. रुबी रुग्णालयात आल्यानंतर शरद पवार कारमधून उतरून व्हिल चेअरने रुग्णालयात गेले. दरम्यान, आता शरद पवार यांच्या तपासणीचे रिपोर्ट समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

शरद पवारांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात (health) उपचार सुरू आहेत. शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. शरद पवार यांच्या प्राथमिक तपासण्यांचा अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टर त्यांच्यावर उपचार काय करावा, याचा निर्णय घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार सगळे उपचार केले जातील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांच्या प्राथमिक (health) तपासण्यांचे काही रिपोर्ट समोर आले आहेत. सध्यातरी कोणतीही चिंतेची बाब नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच शरद पवार यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर प्रायव्हेट रुममध्ये उपचार केले जात आहेत. मॉनिटरवर दिसणाऱ्या मोजमापांनुसार शरद पवार यांच्या हृदयाचे ठोके (हार्ट रेट) सुमारे 74 प्रति मिनिट आहेत. हा रिपोर्ट प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य मर्यादेत आहे ऑक्सिजनचे प्रमाण हे सुमारे 98 टक्के आहे. ही पातळी सामान्य असून रक्तातील ऑक्सिजन पुरेसा असल्याचे दर्शवते. श्वसनगती (रिस्पायरेटरी रेट) सुमारे 26 प्रति मिनिटे असून ही संख्या सामान्यपेक्षा जास्त आहे. प्रौढांसाठी हे प्रमाण साधारण 12–20 प्रति मिनिटे असते. म्हणजेच श्वसन वेग वाढलेला आहे. या आकडेवारीनुसार रुग्णाचे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर व समाधानकारक आहेत. मात्र, श्वसन वेग वाढलेला दिसतो, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी