तावडे हॉटेल परिसरात महापालिकेचा ‘हातोडा’ विनापरवाना व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त?

कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल परिसरात आज सोमवारी (दि.22) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या भागातील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला असून, (Eradication) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कारवाईचे स्वरूप महापालिकेच्यावतीने आज सकाळपासूनच तीन स्वतंत्र पथके पोलीस बंदोबस्तात तावडे हॉटेल परिसरात दाखल झाली. जेसीबी, डंपर, (Eradication) गॅस कटर आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने विनापरवाना बांधकामे भुईसपाट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातील एकूण २०४ बांधकामांपैकी १७७ मिळकतींना २५ जूनपर्यंत कायदेशीर स्थगिती मिळाली आहे. मात्र, ज्या २७ मिळकतींना कोणतीही स्थगिती नाही, अशा केवळ व्यावसायिक बांधकामांवर ही कारवाई केली जात आहे. (Eradication) यामध्ये निवासी बांधकामांना वगळण्यात आले आहे. कारवाई सुरू झाल्यामुळे तावडे हॉटेल परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वतः उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?