राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result 2026) महायुतीने एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या या चुरशीच्या लढतीत महायुतीने तब्बल १६ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. केवळ नाशिकच्या एका जागेवर भाजपच्या बंडखोर उमेदवाराने अपक्ष बाजी मारली.

या निवडणुकीचा अंतिम निकाल पाहता भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने ३, राष्ट्रवादी काँग्रेसने २ आणि अपक्ष उमेदवाराने १ जागा जिंकली आहे. या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, (political) ज्यापैकी ६ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली होती. उरलेल्या ११ जागांचे चित्र आज मतमोजणीनंतर पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
महायुतीचे जागावाटप आणि यशाची टक्केवारी या निवडणुकीसाठी महायुतीमधील प्रमुख घटकांमध्ये जागावाटपाचा एक निश्चित फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार भाजपने ११, शिवसेनेने ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपने आपल्या कोट्यातील सर्व ११ पैकी ११ जागांवर शंभर टक्के यश मिळवले आहे. (political) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही २ पैकी २ जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली. मात्र, शिवसेनेला ४ पैकी ३ जागांवरच विजय मिळवता आला. नाशिकची हक्काची जागा महायुतीत शिवसेनेला सुटली होती, परंतु तेथील अंतर्गत बंडखोरीचा मोठा फटका पक्षाला बसला. अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.
अनुक्रमांकमतदारसंघविजयी उमेदवारराजकीय पक्षनिवडीचे स्वरूप
मतदारसंघ विजयी उमेदवार राजकीय पक्ष निवडीचे स्वरूप
१ ठाणे रवींद्र फाटक शिवसेना बिनविरोध
२ यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना बिनविरोध
३ रायगडरत्नागिरी-सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध
४ पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस बिनविरोध
५ वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर अरुण लखाणी भाजप बिनविरोध
६ अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे भाजप बिनविरोध
७ छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास शिरसाट भाजप विजयी
८ नाशिक गोकुळ गीते अपक्ष (भाजप बंडखोर) विजयी
९ भंडारा-गोंदिया अविनाश ब्राह्मणकर भाजप विजयी
१० सांगली-सातारा धैर्यशील कदम भाजप विजयी
११ परभणी-हिंगोली सईद खान शिवसेना विजयी
१२ सोलापूर राजेंद्र राऊत भाजप विजयी
१३ धाराशिव-लातूर-बीड बसवराज पाटील भाजप विजयी
१४ नागपूर राजीव पोतदार भाजप विजयी
१५ जळगाव नंदकिशोर भाजप विजयी
१६ अमरावती प्रवीण पोटे भाजप विजयी
१७ नांदेड अमर राजूरकर भाजप विजयी
नाशिकच्या जागेवरील छुप्या रणनीतीचा थरार सर्व १७ जागांमध्ये नाशिक मतदारसंघाचा निकाल हा सर्वात चक्रावून टाकणारा आणि राजकीय पंडितांचे अंदाज चुकवणारा ठरला. महायुतीच्या जागावाटपानुसार ही जागा शिवसेनेला मिळाली होती आणि पक्षाने तेथे नरेंद्र दराडे यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. मात्र, भाजपचे स्थानिक नेते गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी पक्षाच्या अधिकृत धोरणाविरोधात जात उमेदवारी अर्ज दाखल केले. नाट्यमय घडामोडींनंतर गणेश गीते यांनी वेळेत आपली माघार घेतली, परंतु गोकुळ गीते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये अनेक बैठका घेतल्या. मतदानाच्या काही दिवस आधी गीतेंनी आपण प्रचारातून मागे हटत असल्याचे जाहीर केले होते, (political) परंतु तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव मतपत्रिकेत कायम होते. त्यांनी पडद्यामागून आपली छुपी रणनीती सुरू ठेवत अखेर विजय संपादन केला, ज्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये गुलालाची उधळण करत मोठा उत्सव साजरा केला.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?