विठ्ठल मंदिर आज रात्रीपासून तीन दिवस दर्शनासाठी बंद?

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम दि. २२ ते २४ जून या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. याकरीता आज, सोमवार दि.२२ रोजी रात्री दहा वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार (Vitthal Temple) असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आसैकर यांनी दिली.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणाची झीज होत आहे. ही झीज भरुन काढण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. (Vitthal Temple) आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समितीचे पदाधिकारी, सल्लागार परिषद सदस्यांच्या शिफारशींनुसार हे काम करण्यात येत आहे. संघटनांचा विरोध न्यायालयाने फेटाळला

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार दि. २२ जून ते २४ जून दरम्यान तीन दिवस होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होऊन वारकरी संप्रदायांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे.(Vitthal Temple) तरीही काही संघटना न्यायालयात गेल्या होत्या; परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने पुरातन विभागानार्फत श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती लेपन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?