भारताच्या महिला क्रिकेट संघाची विजयाची हॅट्रिक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खंडित झाली असली तरी या पराभवाकडे अनेकजण एका वेगळ्या नजरेने पाहत आहेत. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट्स राखून भारतावर मात केली आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतील समीकरणे अधिक रंगतदार केली. (cricket team) मात्र या पराभवानंतरही भारतीय चाहत्यांमध्ये आशावाद कायम आहे, कारण इतिहासात अशाच एका योगायोगाने भारताला विश्वविजेतेपदाचा मार्ग दाखवला होता.

गेल्या दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांचा आढावा घेतल्यास एक रंजक बाब समोर येते. महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघाला स्पर्धेतील पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेकडूनच पत्करावा लागला होता. (cricket team) मात्र त्यानंतर संघाने दमदार पुनरागमन करत अंतिम फेरी गाठली आणि इतिहास रचत प्रथमच विश्वचषक जिंकला.याचप्रमाणे पुरुष टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतही भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. त्या धक्क्यानंतर भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावत स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात शानदार खेळ केला आणि अखेरीस विजेतेपदावर मोहोर उमटवली.
आता महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्येही तसाच योगायोग पाहायला मिळत आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाला आहे. त्यामुळे हा पराभव केवळ धक्का नसून, इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा संकेत ठरतो का, (cricket team) याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.अर्थात, केवळ योगायोगावर विजय अवलंबून नसतो. आगामी सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी, योग्य रणनीती आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता यावर भारतीय संघाचे भवितव्य ठरणार आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर निर्माण झालेला हा ‘लकी सिग्नल’ भारतीय चाहत्यांच्या आशा नक्कीच वाढवणारा ठरत आहे.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?