मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी चा (Marathi television) सहावा सीझन सध्या प्रचंड गाजत आहे. प्रत्येक भागागणिक घरातील वातावरण अधिकच तापताना दिसत असून प्रेक्षकांमध्ये या पर्वाबद्दल जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे. घरात अलीकडेच झालेल्या एका वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे संपूर्ण गेमचं समीकरण बदलल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Marathi television) घरात दाखल होताच स्पर्धकांची अक्षरशः झोप उडाली आहे. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले असून वाद, आरोप-प्रत्यारोप आणि मोठमोठ्याने भांडणांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांतच राखीचे अनेक सदस्यांसोबत तीव्र वाद झाले असून तिच्या आक्रमक शैलीमुळे घरातील तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.

अलीकडील भागात राखीने रागाच्या भरात घरात (Marathi television) गोंधळ घातल्याचे दृश्य समोर आले. बेडरूममध्ये कचरा टाकणे, किचनमध्ये अव्यवस्था निर्माण करणे अशा प्रकारांमुळे घरातील सदस्य संतप्त झाले. या प्रकारानंतर बिग बॉसकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परिस्थिती इतकी बिघडली की राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आले आणि तिच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या (Marathi television) प्रोमोमध्ये दोन जण राखीला घराबाहेर घेऊन जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा कडक आवाज, राखीची माफी आणि घराबाहेर जाण्याची वेळ आली का अशी निर्माण झालेली शंका यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राखी मात्र मला या घरातच राहायचे आहे असे म्हणताना दिसते, पण तिचा हात पकडून तिला बाहेर नेले जात असल्याने खरोखरच तिची एक्झिट होणार का याबाबत चर्चा रंगली आहे.राखी सावंतची ही एन्ट्री टीआरपीसाठी गेमचेंजर ठरणार की तिचा प्रवास इथेच संपणार, हे येणाऱ्या भागांत स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी बिग बॉस मराठी च्या घरात राखीमुळे निर्माण झालेला गोंधळ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं