केतन अग्रवाल हत्येप्रकरणात आता राज्य शासनाने अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील दोषींना कठोरतम शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. कुटुंबाची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य केली असून, (Devendra Fadnavis) या खटल्यासाठी देशातील प्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

“लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, (Devendra Fadnavis) यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालयआणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.”
सियाचा भाऊ ‘साहिल गोयल’ची लोणावळा पोलिसांकडून कसून चौकशी दुसरीकडे, या हत्याकांडाच्या कटात गोयल कुटुंबातील इतर कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. मुख्य आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.जबाब नोंदवण्याचे काम सुरू: “सियाचा भाऊ साहिल गोयल याला पोलिसांनी जबाब घेण्यासाठी बोलावले आहे. गेल्या काही तासांपासून त्याची सातत्याने चौकशी सुरू असून त्याचा अधिकृत जबाब नोंदवला जात आहे.”
सहकार्य करत आहे: पोलीस निरीक्षक तायडे यांनी सांगितले की, साहिल गोयल पोलिसांना तपासात सहकार्य करत असून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देत आहे.अग्रवाल कुटुंबाच्या आरोपांची दखल: अग्रवाल कुटुंबाने गोयल परिवारावर जे काही गंभीर आरोप केले आहेत, (Devendra Fadnavis) त्या प्रत्येक बाजूने पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत. सध्या सर्व तांत्रिक आणि कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी पोलीस कोठडीत असून, आता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याने आणि सरकारची बाजू उज्ज्वल निकम मांडणार असल्याने केतनच्या कुटुंबाला लवकरच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?
घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?