पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. (recipe) अशावेळी तुम्ही पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवू शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या थंडाव्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आजारपण वाढते आणि सर्दी, खोकला होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. (recipe) त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. सूप हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मक्याचे दाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे मुलांना मक्याच्या दाण्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. पालक खाल्ल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि थकवा, अशक्तपणा कमी होतो. चला तर जाणून घेऊया पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
पालक
मक्याचे दाणे
काळीमिरी पावडर
मीठ
लसूण
आलं
कॉर्नफ्लावर
तेल
लिंबाचा रस
कोथिंबीर
कृती:
पालक मक्याच्या दाण्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून तीन वेळा पाण्याने धुवून घ्या.टोपात पाणी गरम करून त्यात पालक टाका आणि एक उकळी काढून शिजवलेला पालक थंड पाण्यात टाकून काहीवेळ ठेवून द्या.मिक्सरच्या भांड्यात पालक पेस्ट करून घ्या. त्याच भांड्यात मक्याचे दाणे, आलं, लसूण, कोथिंबीर घालून बारीक पेस्ट बनवा.टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून लालसर होईपर्यंत भाजा.(recipe) त्यानंतर त्यात तयार केलेली पालक पेस्ट आणि शिजवलेल्या पालकचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. आवश्यकता वाटल्या तुम्ही पालकमध्ये गरम पाणी सुद्धा टाकू शकता.त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सूपला उकळी काढा.वाटीमध्ये कॉर्नफ्लावर घालून पेस्ट बनवा आणि तयार केलेल्या सूपमध्ये ओतून मिक्स करा. यामुळे सूपला घट्टपणा येईल. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक मक्याच्या दाण्यांचे सूप.
हेही वाचा :
पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?
कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?
30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?