कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पावसाच्या कोसळधारा सुरू झाल्या, रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले कि, नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. यंदाचा पावसाळा त्याला अपवाद नाही. चार दिवसात पाच पेक्षा अधिक पावसामुळे बळी गेले आहेत. (torrential) बहुतांशी बळी हे स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत असतात. मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शालेय बालकासह एका वृद्धाचा बळी गेला आहे. मॅन होलमध्ये पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे राजकारण केले जात असल्याचे विदारक चित्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळाले आहे.

स्कूल बसवर चेंबूर परिसरात एक झाड कोसळले आणि बस मधील एका बालकाचा त्यात दुर्दैवी अंत झाला. हे झाड केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते तोडण्यात यावे असा अहवाल मुंबईच्या उद्यान विभागाकडून महापालिकेच्या प्रधान कार्यालयाला पाठवण्यात आला होता पण तिकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. वेळीच हे झाड तोडून टाकले असते तर त्या निष्पाप बालकाचा जीव गेला नसता. या घटनेवरून चेंबर परिसरातील सामान्य माणूस आक्रमक झाला होता. हे प्रकरण अगदी ताजे असताना घाटकोपर परिसरात असलेल्या उघड्या मॅन होलमध्ये पडून एका वृद्ध व्यक्तीचा अंत झाला. या घटनेने लोक हळहळले आणि संतापले सुद्धा. संजय घाडी, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे यांच्यासह काहीजणानी या घटनेचे खापर मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या महायुतीवर फोडले. तर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. विरोधी नगरसेवकांनी थेट आयुक्त अश्विनी भिडे यांनाच जबाबदार धरून (torrential) त्यांच्यावर सदाशिव मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. घडलेल्या या घटनेमुळे महापालिका प्रशासनाची अनास्था पुढे आली आहे. दोन चार अधिकाऱ्यांना निलंबित करून जनक्षोभ कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
मुंबई शहरात 7 हजार मॅन होल आहेत. त्यापैकी 3 हजार मॅन होलवर झाकणे लावण्यात आलेली नाहीत अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. झाकणे बसवण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले होते, त्याच्याकडून हे काम नीट झाले नाही असा ठपका ठेवून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला आहे. मुंबईत घडलेल्या या घटनांना महापालिकेचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. अशा प्रकारची झाकणे नसलेली मॅन होल्स नगरसेवकांच्या तसेच महापालिका अभियंत्यांच्या नजरेत कशी काय आली नाहीत? या घटनेला केवळ सत्ताधारी जबाबदार आहेत असे म्हणता येणार नाही त्याला महापालिकेतील विरोधी पक्षीय नगरसेवक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. एकाही नगरसेवकांच्या नजरेला अशा प्रकारची मॅन होल्स येऊ नयेत हेच आश्चर्य आहे. मुंबईतील अशा मॅन होलमध्ये पडून दोनच वर्षांपूर्वी एका डॉक्टरचा बळी गेला होता. उघडी असलेली ही होल्स म्हणजे साक्षात मृत्यूची विवरे आहेत.
पावसाळ्यात मुंबईतील बहुतांशी रस्ते पाण्याखाली जातात. या पाण्यातून चालत वाट काढत जाणाऱ्या नागरिकांना ही होल्स दिसत नाहीत. अशा प्रकारच्या उघड्या होल जवळ धोका असल्याची पार्टी लावली जाते. पण सर्वच ठिकाणी अशा पाट्या दिसत नाहीत. मुंबई शहरातच अशा जीव घेण्या घटना घडतात असे नाही. राज्यातील इतर महानगरामध्ये सुद्धा स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारचे बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कोल्हापूर शहरात अशा प्रकारच्या दोन घटना या वर्षभरात घडलेल्या आहेत. एका कंत्राटदाराने खोदून ठेवलेला भला मोठा खड्डा पावसाळ्यात भरून गेला होता. त्यावर शेवाळे साचलेले होते. (torrential) त्यामध्ये एक लहान बालक पडून बुडून मरण पावले होते. अशीच घटना आणखी एका उपनगरात घडली होती. तेथेही खड्डा आहे याची माहिती नसलेल्या एका निष्पाप नागरिकाचा बुडून मृत्यू झाला होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर खडाजंगी चर्चा झाली होती मात्र या मृत्यूला जबाबदार कोण? याचा निर्णय झाला नाही. वास्तविक अशा घटनांमध्ये संबंधित अभियंता याला जबाबदार धरले पाहिजे तसेच खोदलेला खड्डा पुन्हा बुजवला नाही म्हणून संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते पण घडलेले नाही.
पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून दोन महिने आधी नालेसफाई केली जाते. शेकडो टन गाळ काढला जातो. मोठ्या गटारी साफ केल्या जातात. पावसाचे पाणी वाहून जावे ते नागरी वस्तीत किंवा घरामध्ये शिरू नये म्हणून नालेसफाई केली जाते. पण त्याचबरोबर अपघाताला निमंत्रण देणारी झाकणे नसलेली मॅनहोल, शोधून त्यावर झाकणे बसवण्याचे काम केले पाहिजे प्रत्यक्ष मात्र तसे होत नाही आणि मग निष्पाप लोकांचे बळी जातात. त्याबद्दल प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीना ना खंत आणि ना खेद असतो. माणसाचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. “बेटा, बोकड महाग और आदमी सस्ता झाला”ही नारायण सुर्वे यांची कविता बरेच काही सांगून जाते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?