चिपरी तालुका शिरोळ येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास २२ वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक (Shocking)घटना समोर आली आहे. माळ भाग अहिल्यानगरची चिप्री येथील रहिवासी संदेश लक्ष्मण शेळके असे या मयत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश शेळके हा सकाळी आपल्या बहिणीस ओला मोटारसायकलवरून तारांगण हॉटेल समोरील बस स्टॉपवर सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग सुरू केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरून गेलेला संदेश शेळके मोटारसायकलसह घोडावत यांच्या पार्किंगच्या संरक्षण भिंतीलगत असणाऱ्या राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गट नंबर ४३४ जवळ पोहचला. मात्र तिथेच पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने मानेवर व शरीरावर एकूण सहा घाव केले(Shocking). या हल्ल्यात संदेश शेळके याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे मोठी गर्दी झाली.
जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. दरम्यान, जयसिंगपूर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस तपास यंत्रणेला मार्गदर्शन दिले आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे.या खुनामागे नेमके कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विविध अंगाने तपास करत असून लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
१२ ऑगस्ट २०२५ रोजी ट्रम्पचा मृत्यू होणार ? द सिम्पसन्सची भविष्यवाणी !
भारतामधील तब्बल ९८ लाख व्हॉट्सअॅप अकाउंट्स बंद, तुमचे खाते तर नाही
भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडे का जाऊ नये? धार्मिक ग्रंथांमधून समोर आलं महत्त्वाचं कारण