जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे(politics) माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. गोरंट्याल हे भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी कैलास गोरंट्याल हाती कमळ घेण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गोरंट्याल काँग्रेसमध्ये नाराज होते. त्यांनी आपली नाराजी अनेकदा अप्रत्यक्षरित्या जाहीरपणे बोलून दाखवली होती. आता तर गोरंट्याल यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
मंत्री नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रीया दिलीय. आमच्याकडे ओघ सुरूच राहणार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. जालन्यातील काँग्रेसचे आक्रमक नेते अशी कैलास गोरंट्याल यांची खास ओळख. शेरोशायरी आणि कविता हाही गोरंट्याल यांचा आवडीचा भाग. म्हणूनच शिवसेनेतल्या एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर पन्नास खोके, एकदम ओके या प्रचंड गाजलेल्या घोषणेचे गोरंट्याल हेच जनक आहेत.

पन्नास खोकेंचा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्यासोबतच ते सत्तेत सहभागी व्हायला निघाले आहेत. मात्र राजकारणात(politics) काहीच शाश्वत नसतं असं म्हणतात. त्याच न्यायानं आता गोरंट्यालच भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल यांच्या रुपानं काँग्रेसचा मोठा मोहरा गळाला लावण्यात भाजपला यश आलं हे मात्र निश्चित आहे.
सामनातून करण्यात आलेल्या दावानुसार मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या शिंदे गटातील मंत्र्यांना नारळ मिळणार आहेत, असं म्हटलं जातंय. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात आधीच राजीनामा दिला आहे.

त्यानंतर सातत्याने वादग्रत ठरलेले माणिकराव कोकाटे(politics) आणि नरहरी झिरवळही हिटलिस्टवर आहेत. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचीही विकेट जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना विधानसभाध्यक्ष करणार असल्याचं भाकितही सामन वृत्तापत्रातून करण्यात आलंय. तसंच राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा असल्याचंही बोलं जातंय.
हेही वाचा :
Maruti Suzuki XL6 च्या बेस व्हेरिएंटची सहज मिळेल चावी, किती करावा लागेल डाउन पेमेंट?
हरिद्वारला फिरायला जाताय? तर तेथील ‘या’ प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
आजचा पहिला श्रावणी शनिवार राशी ठरणार भाग्यशाली! शनिदेवांचा आशीर्वाद आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा